विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबिसींचा बांधवांचा मुरबाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल..! Shabd Mashal

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबिसींचा बांधवांचा मुरबाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल..!|OBCs attack Murbad tehsil office for various pending demands..

OBCs attack Murbad tehsil office for various pending demands
OBCs attack Murbad tehsil office for various pending demands

मुरबाड (दि. २४) : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून देण्यासाठी आज मुरबाड तहसिल कार्यालयावर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी हल्लाबोल करीत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना दिले.

OBCs attack Murbad tehsil office for various pending demands
OBCs attack Murbad tehsil office for various pending demands (Kishor Gaikwad)

  गेली अनेक वर्षे ओबिसी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी भांडत असून राज्य सरकार व केंद्र सरकार जाणीवपूर्वक ओबिसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ओबिसी समाजावर अन्याय करत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक आंदोलकांनी व्यक्त केल्या.      

The OBC community in the taluka handed over their various demands to the tehsildar.
The OBC community in the taluka handed over their various demands to the tehsildar.

   राज्य सरकार व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी  महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयावर राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या वतिने आज जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. मुरबाड तहसिल कार्यालच्या प्रवेशव्दारावर सकाळी ११ वाजेपासून आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध करीत, 'उठ ओबिसी हो जागा हो आंदोलनाचा धागा हो', 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे' अशा विविध घोषणांनी तहसिल कार्यालय दणाणून सोडले.                          

  स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबिसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, गेली कित्येक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या ओबिसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी पूर्ण करावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे, नाॕन क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, ओबिसी मंत्रालय आहे, पण निधीचा पत्ता नाही, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यामोर्चात कुणबी समाज संघटनेचे  मुरबाड तालुका सरचिटणीस  प्रकाश पवार , शिवसेना तालुका प्रमुख कांतिलाल कंटे, काॕंग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा कंटे, सुवर्णा ठाकरे, योगिता शिर्के, अॕड. वैशाली घरत, अॕड. विलास घरत, मिलींद मडके, भालचंद्र गोडांबे, नरेश म्हाडसे सह अनेक बांधव सहभागी झाले होते. तर या आंदोलनाचे नियोजन ओबिसी जनमोर्चाचे  तालुका संघटक उमेश पाटिल यांनी केले होते.


Nashik District Court Recruitment 2021|नाशिक जिल्हा न्यायालय भरती - Shabd Mashal

Indian Army NCC Recruitment 2021 | भारतीय सैन्य NCC भरती 2021 - Shabd Mashal

Thane Municipal Corporation Recruitment 2021| TMC Recruitment 2021 - Shabd Mashal


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 


किशोर गायकवाड )
___________________________________________




ADV

bestwaystoearn


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments