सदूच्या वाडीतील 'त्या' चिमुकलीला मिळाला मायेचा आधार | Kishor Gaikwad - Shabd Mashal

 सदूच्या वाडीतील 'त्या' चिमुकलीला मिळाला मायेचा आधार..!


[KISHOR K. GAIKWAD]

मुरबाड (दि. ३०) : खासदार सुप्रिया सुळे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभर विविध उपक्रम राबविले जात असतांना मुरबाडमध्ये ही कार्यकर्त्यांनी दिवभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले.


  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश मधुकर भोईर यांनी तालुक्यातील सदूची वाडी खाटेघर येथील सिया दशरथ वाघ या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीच्या आगामी शैक्षणिक वर्षाची जबाबदारी स्वीकारून तिच्या कुटुंबियांचा आर्थिक ओझं काही प्रमाणात कमी केलं आहे. सिया ही अभ्यासात हुशार असून तिची शैक्षणिक गुणवत्ता पाहता तिला मदतीचा हात मिळाल्यास ती नक्कीच तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे भविष्य उज्वल करेल असा विश्वास यावेळी भोईर यांनी व्यक्त केला. तसेच यापुढे तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकास कार्यात युवक राष्ट्रवादी अधिक लक्ष देणार असून तालुक्यात पक्षवाढीसाठी नेटाने काम करणार असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले आहे. 


  तर या उपक्रमा समवेत शहरात सकाळी शहराध्यक्ष दिपक वाघचौडे व त्यांच्या टीम तर्फे मोफत पॅनकार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथील रुग्णांना फळे वाटप, किशोर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, असे विविध उपक्रम याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षातर्फे राबविण्यात आले.


किशोर गायकवाड )
______________________________________________

[विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबिसीं बांधवांचा मुरबाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल..! ]

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा





ADV

bestwaystoearn


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments