संतापजनक : कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा टेम्पो जप्त! जनावरांमध्ये मृत बैलाचा समावेश... पहा फोटो/व्हिडिओ! [ KISHOR K. GAIKWAD]

संतापजनक : कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा टेम्पो जप्त!  

जनावरांमध्ये मृत बैलाचा समावेश... पहा फोटो/व्हिडिओ!  

 [ KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड : (दि. २३) मुरबाड तालुक्यातून अवैधरित्या जनावरांच्या वाहतुकीचे सत्र अद्यापही सुरू असल्याचे समोर आले असून याबाबत आज हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.
  जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आयशर ट्रक मागील महिन्यात मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर जनावरांना गोशाळेत रवाना केल्याची घटना ताजी असतांनाच आज पुन्हा एक पिकअप टेम्पो पहाटेच्या सुमारास २ गायी व ५ बैल अवैधरित्या वाहतूक करून कत्तलीच्या उद्देशाने नेतांना मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
 


  एम. एच. ०४ एच. एस. १३८७ क्रमांकाच्या पिकअप टेम्पो गाडीत शहापूरच्या गेगाव वरून बदलापूरला अवैध रित्या जनावरे वाहतूक करीत असल्याची माहिती मुरबाड पोलिसांना प्राप्त झाल्याने शहराच्या तिनहात नाक्यावर सदर वाहनाला अडवून ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान सदर गाडीतील बैल मृत्यू पावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी चालक अविनाश गोंधळी (वय २९) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पिकअप टेम्पो सह ७ जनावरे, असा सुमारे ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२९, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ अ, ५ ब, ६ तसेच मोटार वाहन १९८८ चे कलम ८३, १७७ अन्वये मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

पकडण्यात आलेली जनावरे फांगणे येथील श्रीकृष्ण गोशाळेत रवाना करण्यात आली असून यात मोहिमेत भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे मुरबाड प्रतिनिधी हनुमंत हिरामण शिंगोळे, नितेश वसंत खारीक, खंडू शिंगोळे, सुदाम शिंगोळे यांनी विशेष सहकार्य केले. मात्र मुरबाड तालुक्यातून कल्याण, बदलापूर दिशेने सर्रास कत्तलीसाठी जनावरांची मोठ्याप्रमाणात वाहतूक होत असल्याची जोरदार चर्चा असतांना पोलिस यंत्रणा या वाहतुकीला रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे. परिणामी पोलिसांच्या कार्यावर संशय निर्माण केला जात असून जनावरे तस्कर माफियांचे धाडस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.



( किशोर गायकवाड )
___________________________________________




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments