कौतुकास्पद : मुरबाड तालुक्याच्या भेटीने नामदार नानाभाऊ उल्हसित - SHABD MASHAL - KISHOR GAIKWAD

 

Nana Patole | Kisan Kathore

कौतुकास्पद : मुरबाड तालुक्याच्या भेटीने नामदार नानाभाऊ उल्हसित


चेतनसिंह पवार यांच्या प्रयत्नांना यश... तालुक्यातील शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न लागणार मार्गी...

मुरबाड : (दि. २१) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी मुरबाड तालुक्याला दिलेल्या भेटीने तालुक्यात उमदिचं वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाड तालुक्यातील पाडाळे धरण बाधित शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप शुभारंभ निमित्ताने ते मुरबाड तालुक्यात उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम बांदलपाडा येथील सिध्देश्वर मठ येथे पार पाडण्यात आला असून यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, प्रदेशसरचिटणीस चेतनसिंह पवार सह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थितीत होते.  

Nana Patole | Kisan Kathore

भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जो हृदयापासून काम करणार तोच यापुढे राजकारणातील खुर्चीवर विराजमान होणार असे भाकीत यावेळी नामदार नाना पटोळे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना कल्याण- मुरबाड टोकावडे रस्त्याच्या चौपदरीकरणा संर्दभात मागणी तसेच ११ वर्षांंपासून सुरू असलेल्या लढ्याला अंतिम स्वरुप देऊन बळीराजाला मानवंदना देण्याचे काम विधानसभा अध्यक्ष यांनी केल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.

  गुरुवारी दुपारी ३:३० वाजता आंबेळे या गावी चेतनसिंह पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व त्यानंतर पाडाळे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला वाटप असा शासकीय कार्यक्रम नियोजित असतांना खासदार कपिल पाटील तसेच तालुक्यातील अन्य काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांच्या आग्रहामुळे या कार्यक्रमाला रात्री उशीर झाला. मात्र नामदार नानाभाऊ पटोळे यांनी सर्व लहानमोठ्या नेत्या-कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली. 

 

Nana Patole | Kisan Kathore

Nana Patole | Kisan Kathore

या दौऱ्या दरम्यान तालुक्यातील अनेक राजकीय समविचारी नेत्यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यातील अडचणी मांडल्या व न्यायाची अपेक्षा केली. वन हक्क दाव्यातील तालुक्याचे बिगर आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांच्या लागवडी खालील वन पट्टे नावे करून सदर शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा, याबाबत निवेदन रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांनी नामदार नानाभाऊंच्या सदिच्छा भेटी दरम्यान दिले. सदर प्रकरणी गंभीरपणे लक्ष देऊन मुरबाड तालुक्यातील भूमिहीन बिगर आदिवासी शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्ती केला आहे. त्यामुळे तालुक्यातील बिगर आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


( किशोर गायकवाड )
___________________________________________

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments