थरारक : अपघात नव्हे, खुनच; मृत मुलीच्या नातेवाईकांचा आरोप! [ KISHOR K. GAIKWAD ]

थरारक : अपघात नव्हे, खुनच; मृत मुलीच्या नातेवाईकांचा आरोप!  

मृताचे नातेवाईक


अपघाती विभाग




[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. ३१) नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका अनपेक्षित घटनेमुळे तालुक्यातील शिदाची उमरोली गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे अपघाताच्या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

  तालुक्यातील शिदाची उमरोली गावातील इयत्ता १० वी मध्ये शिकणारी मुलगी सकाळी शिकवणीसाठी धसई येथे गेली असता दुपारच्या दरम्यान तिचा खानिवरे वाडी येथे अपघात झाल्याची माहिती फोनद्वारे मिळताच कुटुंबियांना धक्का बसला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सदर मुलगी म्हाडस येथील युवका सोबत एम. एच. ०५ डी. एक्स. ३१४१ या दुचाकीवर पाठीमागे बसून म्हसा दिशेकडून धसई दिशेकडे जात असतांना साकुर्ली हद्दी दरम्यान दुचाकीचा अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी स्लिप होऊन मुलगी रस्त्यावर पडली व यात तिच्या डोक्याला, शरीराला इतरत्र गंभीर जखमा झाल्याचे एफ. आर. आय. मध्ये नमूद आहे. सदर मुलीला मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी अंती तिला मृत घोषित केले. 

  याप्रकरणी मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २७९, ३०४-अ, ३३७, ३३८ तसेच मोटरवाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
तक्रारी अर्ज

 सदरचा प्रकार अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करीत मृत मुलीच्या नातेवाईकांनी सायंकाळी उशिरापर्यंत शव ताब्यात घेण्यास नाकार दिला. लेखी प्रत्राद्वारे संबंधित घटनेची संपूर्ण चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी व न्याय मिळावा, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.
 
( किशोर गायकवाड )
___________________________________________






(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments