दिलासादायक : न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचा दिलासा | रिपाई सेक्युलरच्या आंदोलनाला यश..! [ K. K. Gaikwad ]

New English School, Murbad

दिलासादायक : न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचा दिलासा  
 
रिपाई सेक्युलरच्या आंदोलनाला यश..!
  
[ K. K. Gaikwad ]
मुरबाड : (दि. ३०) विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक तुघलकी फतव्यामुळे कालपर्यंत नव्याने चर्चेत आलेल्या मुरबाड शहरातील दुय्यम शिक्षण संस्थेने आज आपला फतवा मागे घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे काल रिपाई सेक्युलर पक्षाने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.   

   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन संस्थेचे सचिव किसन चौधरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल मुरबाडच्या कार्यालयामध्ये पदाधिकारी, पालक व रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या सोबत बैठक करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी असणाऱ्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. 
   
  ज्या विद्यार्थ्याची मागील शैक्षणिक वर्षाची फी बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांना सवलतीसाठी विनंती अर्जाचा फॉरमॅट तयार करण्यात आला आहे. सदरचा अर्ज भरून विद्यार्थ्यांनी तो संस्थेमध्ये सादर करायचा आहे. तद्नंतर संबधित शिक्षक त्या अर्जाची खात्री करतील व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत प्राप्त होईल. त्यामुळे ज्या पालकांचा लॉकडाउन काळात रोजगार गेला आहे, अशा पालकांना व त्यांच्या पाल्यांना याचा लाभ होणार आहे. तर 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे आमच्या पाल्यांना न्याय मिळाला', अशा प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या असून यासाठी रिपाई सेक्युलर पक्षाचे आभार मानले आहेत.

( किशोर गायकवाड )
___________________________________________





(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments