'अंदाजे महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपणास पुढील कार्यवाही अवगत केली जाईल' - नगर पंचायत, मुरबाड [ KISHOR K. GAIKWAD ]

'अंदाजे महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपणास पुढील कार्यवाही अवगत केली जाईल' -नगर पंचायत, मुरबाड

प्रवेशद्वाराचा निकाल लांबणीवर


Murbad news


[ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : (दि. १९) नामकरण प्रकरणी दिनांक १५ ऑगस्ट पासून मुरबाड शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा मुद्दा चांगलाच तापला असतांना आज याबाबत रिपाई आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.

Murbad news


  मुरबाडकरांना विश्वासात न घेता मुरबाड शहराच्या प्रवेशद्वाराला 'महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार' नामकरण केल्याचा आरोप करीत आज रिपाई आठवले पक्षाने मुरबाड नगर पंचायतवर हल्ला बोल केला. याबाबत कमान/प्रवेशद्वार मुरबाड नगर पंचायतने बांधलेली नाही किंवा तशी परवानगी ही दिलेली नसल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या सहीचे लेखी पत्र दोन दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे सदर अनधिकृत कमानीवरील नामफकल न काढल्यास आज तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. 

  


  त्यानुसार आज कार्यकर्त्यांनी मुरबाड नगर पंचायत कार्यालयाला घेराव घातला होता. याप्रसंगी मोठा पोलिसी फौजफाटा मुरबाडमध्ये पाहायला मिळाला. सद्याचे कोरोनाचे सावट, पावसाळी आपत्तीजन्य स्थिती तसेच गणेशोत्सव असल्याने अंदाजे महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपणास पुढील कार्यवाही अवगत करण्यात येईल, अशा आशयाचे लेखी पत्र मिळाल्याने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या एक महिन्याच्या मुदतीमागे आता नगर पंचायतचे नेमके काय नियोजन आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

_________________________________________________

घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत इ-पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया

• https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा

• Continue to Homepage या येथे क्लिक क्लिक करून Home page वर या

• त्यानंतर Quick Links खालील Instant PAN through Aadhaar* या पर्यायावर क्लिक करा

• त्यामध्ये Get New Pan पर्याय निवडा

• येथे आधारकार्ड क्रमांक टाकून दिलेला Captcha Code काळजीपूर्वक नोंदवून I confirm that या चेक बॉक्सवर क्लिक करून Generate Aadhar OTP येथे क्लिक करावे

 • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकवर मॅसेजद्वारे OTP क्रमांक येईल. तो विहित वेळेत सदर वेबसाईटवरच्या ठिकाणी नोंदवावे. (मोबाईल आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य)

 • यानंतर एक पीडीएफ फाईल (PDF File) जनरेट होईल. यात अर्जदाराची सर्व डेमोग्राफीक माहिती असेल. ही फाईल ओपन करण्यासाठी अर्जदाराने पासवर्ड म्हणून आपली जन्मदिनांक कोणत्याही प्रकारची विरामचिन्हे अथवा स्पेस न देता टाकणे अनिवार्य आहे.

______________________________________________


आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad


Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments