बारवी प्रकल्प पीडितांच्या मागण्यांचं घोंगडं भिजतच..!
उपोषणाने केली पुनर्वसनाची पोलखोल
मुरबाड : (दि. १९) आपल्या विविध मागण्यांसाठी आज शेकडो बारवी धरण प्रकल्प पीडितांनी मुरबाड तहसिल कार्यालया समोर एकदिवसीय उपोषण केल्याने पुन्हा एकदा एम. आय. डी. सी. प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मुंबई सारख्या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढविल्याने मुरबाड तालुक्यातील सुमारे १,२०४ कुटुंबांवर स्थलांतरणाची वेळ ओढवली असतांना त्यांच्या नव्याने विस्थापन प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाची आहे. मात्र ते याबाबत गांभीर्य बाळगत नसल्याच्या आरोप करीत आज या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
![]() |
| Barvi Dam |
घरांचे रखडलेले पेमेंट मिळावे, घरांच्या-जमिनींच्या भावात तफावत नसावी, संपादित न केलेल्या मात्र पाण्याखाली गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा, सरसकट सर्वांना खावटी मिळावी, तीन वर्षांपासून अडकवलेली घरांची २० टक्के पेंडिंग रक्कम पीडितांना द्यावी, ठरल्याप्रमाणे घरटी एक माणसाला नोकरी द्यावी, तसेच अन्य सामाजिक सुविधा ही मिळाव्यात, अशा अनेक प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आयोजित केले असल्याचे बारवी धरण प्रकल्प पीडित सेवा संघ, मुरबाडचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी सांगितले. याप्रसंगी चंद्रकांत बोष्टे, हरेश पुरोहित, दीपक भोईर, दशरथ देसले, दीपक म्हाडसे, संतोष भालेराव, परेश कडव, गणपत कडाळे, भास्कर खंडागळे यांच्या सह शेकडो बारवी पीडित उपस्थित होते. तर या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शासनाला देण्यात आला आहे.
मात्र बारवी प्रकल्प ग्रस्तांच्या स्थलांतरणाचा मुद्दा पूर्णपणे मार्गी लागल्याचा केलेला दावा या उपोषणामुळे खोटा ठरला असून मुरबाडकरांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.
"बारवी पीडितांच्या मागण्यांचा प्रस्ताव मुंबईच्या हेड ऑफिसला पाठविण्यात आला असून याबाबत आम्ही पाठपुरावा करत अहोत. तसेच बाधितांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत प्रक्रिया सुरू असून यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत व अन्य माहिती देण्यातसाठी सदर लाभार्थ्यांची मिटिंग घेतली जाणार आहे. सद्या कोरोनामुळे थोडा उशीर झाला असून या पीडितांच्या मागण्यांबाबत एमआयडीसी प्रशासन सकारात्मक आहे."
-कालिदास एस. भांडेकर, अधिक्षक अभियंता, डोंबिवली (एम. आय. डी. सी. विभाग)
"बारवी पीडितांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. त्यापैकी खावटी, नोकऱ्या, घरांचे मूल्यांकन याबाबत कारवाई चालू आहे. नोकऱ्यांबाबत अर्जदारांना पत्र दिले आहे. कोरोनामुळे मागील सहा महिने कामकाज बंद राहिले. मात्र या काळात ही आम्ही मंजूर झालेल्या खवट्यांचे वाटप केले आहे. तरी उर्वरित मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
-सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता, अंबरनाथ(एम. आय. डी. सी. विभाग)
Kishor K Gaikwad
Shabd Mashal
_________________________________________________
घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत इ-पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया
• https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा
• Continue to Homepage या येथे क्लिक क्लिक करून Home page वर या
• त्यानंतर Quick Links खालील Instant PAN through Aadhaar* या पर्यायावर क्लिक करा
• त्यामध्ये Get New Pan पर्याय निवडा
• येथे आधारकार्ड क्रमांक टाकून दिलेला Captcha Code काळजीपूर्वक नोंदवून I confirm that या चेक बॉक्सवर क्लिक करून Generate Aadhar OTP येथे क्लिक करावे
• त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकवर मॅसेजद्वारे OTP क्रमांक येईल. तो विहित वेळेत सदर वेबसाईटवरच्या ठिकाणी नोंदवावे. (मोबाईल आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य)
• यानंतर एक पीडीएफ फाईल (PDF File) जनरेट होईल. यात अर्जदाराची सर्व डेमोग्राफीक माहिती असेल. ही फाईल ओपन करण्यासाठी अर्जदाराने पासवर्ड म्हणून आपली जन्मदिनांक कोणत्याही प्रकारची विरामचिन्हे अथवा स्पेस न देता टाकणे अनिवार्य आहे.
मोठा खुलासा : 'ती कमानी आम्ही बांधलेली नाही किंवा बांधण्याची परवानगी ही दिलेली नाही' -नगर पंचायत, मुरबाड - मुरबाड शहराच्या कमानीचा वाद पोहचला पोलिस ठाण्यात... - [ KISHOR K. GAIKWAD ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |


0 Comments