[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड: (दि. ११) मुरबाड शहरातील पथविक्रेते, फेरीवाले व अन्य छोटा व्यवसाय करणाऱ्यांना खेळते भांडवल विकत घेण्यासाठी मुरबाड नगर पंचायतच्या माध्यमातून १०,००० रुपयांचे कर्ज मिळवता येणार आहे.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजने अंतर्गत मुरबाडच्या पथविक्रेत्या छोट्या व्यावसायिकांना रुपये १०,००० पर्यंत खेळत्या भांडवल घेण्यासाठी एक वर्षाच्या परतफेड मुदतीवर कर्ज मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक हातभार लागणार आहे. मात्र यात काही मर्यादा ही समाविष्ट असल्याने योजनेचा लाभ घेणाऱ्या इच्छुकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी दिनांक २४ मार्च २०२० पूर्वीचा पथविक्री व्यावसायिक असायला हवा. सदर कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटरची/हमीदाराची आवश्यकता भासणार नसून १ वर्षात याची परतफेड करणे बंधनकारक असेल. तसे केल्यास यापुढे ७% अनुदानीत व्याजावर पुन्हा सदर लाभार्थ्यांला अधिक राक्केमेचे कर्ज मिळू शकेल (उदा. जर व्याजदर १०% असेल तर सदर लाभार्थ्यांला त्यातून ७% टक्के व्याज माफ होऊन अवघे २% व्याजदर लागू राहील). या कर्जाच्या व्याजदराची रक्कम रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुचनेप्रमाणे लागू राहील. जी व्यक्ती मुरबाड नगर पंचायत क्षेत्राच्या बाहेर रहिवास करते मात्र दि. २४ मार्च २०२० च्या अगोदर पासून नगर पंचायत क्षेत्रात छोटेखानी व्यवसाय करते, असे व्यावसायिक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
(PM SVANidhi) योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक:-
• पासपोर्ट साईज फोटो
• आधारकार्ड
• बँक पासबुक
• रेशनकार्ड
• बाजार पावती
• नगर पंचायतचे ओळखपत्र
• मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक
कर्जाची रक्कम लाभार्थ्यांने सादर केलेल्या बँक खात्यात जमा होईल. तसेच ज्या लाभार्थ्याचा आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांना मुरबाड नगर पंचायतच्या कार्यालया वरील आधार केंद्रा अथवा अन्य CSC केंद्राला भेट देऊन करून घेता येईल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी उपरोक्त कागदपत्रे मुरबाड नगर पंचायत कार्यालयात जमा करू शकतात अथवा ऑनलाइन पध्दतीने ही भरू शकतात. त्यामुळे मुरबाडच्या पात्र पथविक्रेत्यांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन लेबरफ्रंट युनियन, मुरबाड युनिटचे मुख्य समन्वयक कॉ. रविंद्र चंदने यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा
नगर पंचायत कर्मचारी:-
श्री. रुपेश माळी
९८६०३३७२७२
श्री. उज्वल पाटील
८१४९२९९८५२
लेबरफ्रंट युनियन:-
निखिल अहिरे
९७६५३५३०६३
[ KISHOR K. GAIKWAD]
______________________________

0 Comments