जागतिक आदिवासी दिनी श्रमजीवी संघटनेकडून शिक्षण पध्दतीचा निषेध
वाचा सविस्तर वृत्त...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड: (दि. ९) मागील काही वर्षांपासून मुरबाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विश्व आदिवासी गौरव दिन जल्लोषात साजरा केला जातो. मात्र सद्याच्या कोरोना संक्रमणामुळे आदिवासी बांधवांची हिरमोड झाली असून आजचा दिवस सार्वजनिक रित्या साजरा न करता घरा घरात, आदिवासीं वाड्या-पाड्यांमध्ये साजरा केला.
हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र येऊन मुरबाड शहरात मिरवणुकीच्या माध्यमातून दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे डोंबारी नृत्य, वेशभूषा, आदिवासी क्रांतिकारकांची व्याख्याने, आदिवासी साहित्य सामग्रीचे प्रदर्शन, गाणी इ. सादर करतात. तर या कार्यक्रमांना मुरबाड तालुक्यातील जनता, राजकीय, सामाजिक मंडळी, अधिकारी मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. परंतु सद्याच्या कोरोना परिस्थितीमुळे यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून गावोगावी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून मुरबाडमध्ये विश्व आदिवासी गौरव दिन साजरा केला.
जागतिक आदिवासी दिनी श्रमजीवी संघटनेकडून शिक्षण पध्दतीचा निषेध
मुरबाडच्या श्रमजीवी युवक संघटने तर्फे आज मुरबाडच्या पंचायत समितीसमोर ऑनलाइन पध्दतीने जाहीर निषेधचा बॅनर धरून आगळ्यावेगळ्या पध्दतीने विश्व आदिवासी गौरव दिन साजरा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या सरकारने घोषित केलेली ऑनलाइन शिक्षण पध्दत लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल, नेटवर्क, मोबाईल रेचार्ग अशा बाबींवर अवलंबून असल्याने गरिबी आदिवासींना ते शक्य नसून निव्वळ श्रीमंतांची पोरंच सद्या शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जणू ही आम्हा आदिवासी गोरगरिबांची थट्टा असून सरकारने याबाबत विचार करणे आवश्यक होते. या भावनेतून हा अनोखा एल्गार श्रमजीवी संघटने तर्फे आयोजित केला होता.
![]() |
| (मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथील आदिवासी वाडीत जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करतांना आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, पत्रकार बाळासाहेब भालेराव, सामाजिक कार्यकर्ते संतोष चौधरी व आदिवासी बांधव...) |
![]() |
| (जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त खोडाळा (जि. पालघर) येथील कातकरी वस्तीतील नाग्या कातकरी सभागृहात फडकी मासिकाचे कार्यकारी संपादक संजय इधे सर यांचे सामाजिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करून जागतिक आदिवासी गौरव दिन केला साजरा...) |
______________________________



0 Comments