ऍड. किरण चन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प आहाराचे वाटप

ऍड. किरण चन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प आहाराचे वाटप

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड: (दि. १९) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी ऍड. किरण चन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड कार्यकारिणी तर्फे मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात अल्प आहाराचे वाटप करण्यात आले.
  आंबेडकरी चळवळीतील योद्धा, विचारांची बुदंड तोफ, प्रखट वक्ता अशा अनेक नावांनी ऍड. किरण चन्ने यांना राज्यभरात ओळखले जाते. भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर आंबेडकरी जनतेची बाजू मांडण्यासाठी ऍड. किरण चन्ने हे आपली 'प्रॅक्टिस' बुडवून भिवंडी येथून स्वखर्चाने पुण्याला धाव घेत असतात. आजवर अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजात त्यांचा मोठा आदर व वजन आहे.
  
  दि. १९ ऑगस्ट ऍड. किरण चन्ने यांच्या वाढदिवस राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. त्यानुषंगाने आज मुरबाडमधील कार्यकर्त्यांनी शासकीय कोविड सेंटरमध्ये व शासकीय रुग्णालयात अल्प आहाराचे वाटप केले.

  तर संपूर्ण देश कोरोनाशी लढत असल्याने अशा स्थितीत ऍड. किरण चन्ने यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता रुग्णांना, डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना फळे, अल्प आहार देऊन साजरा करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, विनोद जाधव, निखिल अहिरे, अक्षय रोकडे, विनय चंदने, रविंद्र गायकवाड, अविनाश रातांबे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


______________________________________________


आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad


Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments