मुरबाड : (दि. ३) मुरबाड शहरा लगतच्या सोसायटीमधील एका ३० वर्षीय गरोदर महिलेचे स्वॅब आज कोरोना टेस्टिंगसाठी रवाना करण्यात आले आहे.
सदर महिलेचे सासर मुरबाड बाहेरील असून तिच्या पतीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी मृताच्या वडिलांचे ही निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
सदर महिला गरोदर असून गत मे महिन्यात या दाम्पत्यांच्या लग्नाला अवघा एक वर्ष झाला होता. सद्या खबरदारी म्हणून तिचे स्वॅब आज टेस्टसाठी रवाना करण्यात आले आहे. या करुण घटनेने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात असून या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह यावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
[ शब्द मशालच्या तमाम वाचकांना कळकळीची विनंती आहे, परिस्थिती गंभीर स्वरूप घेत आहे. कृपया आपल्या परिवाराची आणि आपल्या संबंधितांची काळजी घ्या. ]
• आजचे रुग्ण थोडक्यात:-
१) वय ५६ वर्षीय पुरुष (जैन मंदिरच्या मागे, सोनार आळी)
२) वय ५६ वर्षीय पुरुष (हनुमान मंदिर समोर, मूथट फायनान्सच्या मागे)
३) वय ३७ वर्षीय पुरुष (संभाजी नगर)
(सर्व मुरबाड शहर रहिवासी)
१) वैशाखरे - वय ३२ वर्षे पुरुष
• आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या = ८३
• बरे होऊन घरी परतलेले एकूण रुग्ण = १५
आज नवीन ५३ स्वॅब टेस्टिंगला गेल्याचे समजते...
वाचा | नवीन नियमानुसार वाहनांच्या मार्यदा...
नागरिकांनो लक्षात घ्या जिल्हाधिकारी सो. ठाणे यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडायचे आहे व त्यासाठी वाहन वापरायचे असल्यास खालील नियम लागू आहे.
• दुकाची वाहन- फक्त एक व्यक्ती
• तीनचाकी वाहन - चालक व एक प्रवासी
• चारचाकी वाहन (टॅक्सी सेवा) - चालक व दोन प्रवासी
• औषधे व जीवनावश्यक उत्पादने निर्मित कारखाने वगळता अन्य खाजगी कारखाने बंद राहतील (याबाबत काही तक्रार, हरकत असल्यास मा. तहसीलदार, मुरबाड यांचेशी संपर्क साधावा!)
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)
![]() |
TILAK SCHOLARS ACADEMY - MURBAD |
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
1 Comments
किशोर परिपुर्ण माहिती : नरेश देसले,मनसे मुरबाड शहरध्यक्ष
ReplyDelete