![]() |
मुरबाड ७ दिवस बंदचा अधिकृत आदेश (पाने २) |
मुरबाड : (दि. २६) कोरोना विषाणूने मुरबाड तालुक्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण केले असून काल एकाच दिवसात चक्क ७ आणि आज २ अशा ९ नव्या व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सामोरे आले आहे. या रुग्णांमध्ये मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, मुरबाड नगर पंचायतचे कर्मचारी, तालुक्यातील बडे राजकीय पुढारी समाविष्ट असल्याचे समजतेय. याबाबत वाचा पुढे सविस्तर...
मुरबाड पोलिस स्टेशनमधून तपासणीसाठी नेलेल्या एका ३२ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आले आहे. सदर पोलिस अधिकारी हा पोलिस स्टेशन मागील पोलिस कर्मचारी वसाहतीमध्ये राहत असून सद्या स्थितीला तिथे अन्य रहदारीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलिसी कामकाज, तपासा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे.
[ वाचा सविस्तर : मुरबाड कोरोना काल पर्यंतचा सविस्तर प्रवास वाचण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा ]
मुरबाड नगर पंचायतमधील वायरमन पदावर कार्यरत असलेल्या माळीपाडा येथील एका ४० वर्षीय कर्मचाऱ्याचे ही कोरोना टेस्ट रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून नगर पंचायत कार्यालय व परिसर सॅनिटाईज करण्यात आले असून सदर व्यक्तीचे राहते परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून रहदारीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच आज नगर पंचायतचे शासकीय कामकाज थांबवून कर्मचारी वर्गाला ही सुट्टी दिल्याचे नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याला त्रास जाणवू लागल्याने मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात त्याने तपासणी केली होती. काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नगर पंचायत प्रशासन खडबडून जागा झाला असून कोणत्या व्यक्तीशी त्याचा संपर्क आलाय? याबाबत शोध सुरू आहे. सद्या त्यावर ठाणे येथे उपचार सुरू आहे.
काल पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये मुरबाड तालुक्यातील भाजपाच्या एका ६८ वर्षीय जिल्हा परिषद सदस्याचे रिपोर्ट ही सामील असल्याचे समजते. आपल्या कामकाजाच्या दौऱ्या दरम्यान त्यांना याची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचे स्वॅब टेस्टिंगला नेण्यात आले होते. सद्या त्यांना उपचारासाठी कल्याण येथील खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्यांंच्या कुटुंबियांची ही स्वॅब टेस्ट होणार आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून वैशाखरे गाव प्रतिबंधित केला आहे.
अस्कोत गावातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असतांना आज त्याच कुटुंबातील अनुक्रमे ६२, ३०, १० वर्षीय महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
कासगाव येथील २५ वर्षीय पुरुषाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचा कोणाशी संपर्क घडून आला? याचा शोध सुरू आहे. या व्यक्तीचे स्वॅब सॅम्पल मुरबाड बाहेर घेतल्यामुळे अधिक माहीत अजून मिळाली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेतलेला मुरबाड शहराच्या हनुमान आळी येथील २२ वर्षीय युवक दि. २१ जून रोजी सायंकाळी मुंबई येथे मृत पावला. त्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज त्याच्या ४२ वर्षीय आईचे व ४९ वर्षीय पित्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. सदर परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे सांगितले आहे.
काल ७ आणि आज २ असे एकूण ९ रुग्ण नव्याने वाढले असून मागील रुग्णांची संख्या १९ व १ मृत्यू धरून आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या २९ वर पोहचली आहे. सद्यस्थितीला वैशाखरे गावात ३९, पशेणी येथील कोरोन्टाईन सेंटरमध्ये ४ व मागील तसेच नव्याने कोरोन्टाईन करण्यात अलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ४३० झाली आहे. आज नव्याने १६ स्वॅब टेस्टिंगला पाठविण्यात आले आहेत. या नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी वैशाखरे येथील रुग्ण वगळता उर्वरित रुग्ण ठाणे येथे उपचार घेत आहेत.
या वाढत्या संकटामुळे उद्या मध्यरात्रीपासून जीवनावश्यक सेवा वगळता मुरबाड तालुक्यातील मुरबाड शहर, वैशाखरे, टोकावडे, धसई, सरळगाव, शिवळे येथील बाजारपेठा ७ दिवस बंद ठेवण्याचे आदेश कल्याण उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे.
कोरोना विषाणूचा थैमान वाढत असून पुढील महिन्यात याचा आद्यप प्रसार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी याबाबत दक्षता बाळगली पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त : मुरबाड पंचायत समितीमध्ये ७५% अनुदानात विविध प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत..!
CET परीक्षे बाबत महाराष्ट्र शासनाची अधिकृत नोटिस
7 Comments
धन्यवाद शब्द मशाल तुमच्या मुळे आम्हाला अतिशय महत्वाची माहिती मिळत आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद साहेब अशीच माहिती पोहोचवत रहा🙏
Deleteअशीच माहिती आमच्या पर्यंत पोचवत रहा.
ReplyDeleteधन्यवाद शब्द मशाल.
धन्यवाद
Deleteधन्यवाद
ReplyDeleteAni Deshmukh
ReplyDeleteThanks