![]() |
Murbad Corona Updates - Shabd Mashal |
मुरबाड : (दि. १९) अवघा देश कोरोनाने त्रस्त असतांना आपला मुरबाड तालुका मात्र काल पर्यंत अगदी सुरक्षित निद्रा घेत होता. नेमकं हेच सुरक्षित वातावरण अधिक वेळ राहू शकले नाही. बेफाम वणव्या सारखा या कोरोनाने मुरबाडच्या शेजारील बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर तालुके आपल्या कचाट्यात घेत थैमान घातला आणि जी भीती मुरबाडकर बाळगून होते, ती अखेर प्रत्यक्षात उतरली. पुन्हा एकदा प्रशासकीय हलगर्जीपणाच्या सवयीमुळे हिरव्या कंदीलाच्या छत्र छायेतील कोरोनामुक्त मुरबाड लाल फितीखाली आला. मुरबाडमध्ये कोविड-19 चे ग्रहण अवतरले.
पहिला रुग्ण -
दिनांक ३१ मार्च रोजी व्हाट्सएपमध्ये मुरबाड शहरातील पहिला पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊन धडकला आणि मुरबाडचा थरकाप सुटला. मुरबाड शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत पहिल्यांदाच सलग तीन दिवस स्मशान शांतता पसरलेली पहावयास मिळाली. हा पहिलाच अनुभव मुरबाडकरांसाठी दाहशतीचा ठरला. मात्र त्या रुग्णाच्या योग्य दक्षतेमुळे मोठा धोका टाळला. थायरोकेयर नामक ज्या खाजगी लॅबमध्ये त्याचे रिपोर्ट करण्यात आले होते, त्यात दोष असल्याचे रुग्णाच्या कुटुंबियांनी सांगितले. शिवाय काही राजकीय कारवायांमुळे त्या लॅबचे पितळ उघडे पडून सद्या ती लॅब कोरोना टेस्टसाठी बंद करण्यात आल्याचे एका बातमीपत्रातून समोर आले आहे.
दुसरा रुग्ण -
दि. १ जून, ठिकाण- मुरबाड शहरातील आंबेडकर नगर!
हा युवक अंबरनाथ येथील एका खाजगी ऑफिसमध्ये कामाला होता. दि. ३ जून रोजी तो मुरबाडला आपल्या घरी आला. मात्र घरी आल्या नंतर त्याला त्रास जाणवू लागल्याचे त्याने सांगितले. दिनांक १ जून रोजी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबीयांचे स्वॅब टेस्टिंगसाठी रवाना करण्यात आले. तसेच सदर परिसर रहदारीसाठी बंद करून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना केले.
तिसरा व चौथा रुग्ण -
दि. २ जून - उमरोली येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले होते. पैकी दोन नमुने पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात भीतीच्या वातावरणात वाढ झाली होती.
पाचवा व सहावा -
दि. ५ जून रोजी पुन्हा आंबेडकर नगर मधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या मातापित्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना ही ठाणे येथे दाखल करण्यात आले.
सातवा रुग्ण -
दि. ६ जून रोजी म्हाडस येथील एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र त्याला ही लागण कशी व कुठे झाली? याबाबत आरोग्य खात्याकडे माहिती नसल्याचे सांगितले.
दरम्यान कामानिमित्ताने तालुक्या बाहेर राहणाऱ्या काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मुरबाडमध्ये संचार केला होता. पैकी व्यापारी मानिवली येथील एक वयस्क इसम त्याच्या इतर आजारांमुळे ठाणे येथे मृत पावल्याचे समजले.
उल्हासनगर येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा सासणे गावातील रहिवासी युवक बदलापूर येथे वास्तव्यास असून दि. २७ एप्रिलला आपल्या सासणे या गावी आला होता. तपासणीसाठी नेलेल्या विविध स्वॅबमधून दि. ३ मे रोजी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला ठाणे येथील वेद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्याचे समजले. मात्र त्याच्या संपर्कातील कुटुंबियांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच ठाणे येथील प्रायव्हेट लॅबमध्ये कामाला असणारा इसम मुरबाड तालुक्यातील आपल्या कान्हार्ले या गावी तो आला होता. त्यालाही त्रास जाणवल्याने ठाणे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्या आले व त्याच्या कुटुंबाला मुरबाडच्या शासकीय आयसोलेशन वॉर्डमध्ये निगराणीत ठेवण्यात आले. मात्र या सर्वांचे टेस्ट रिपोर्ट ठाणे येथे करण्यात आल्याने मुरबाडच्या आरोग्य विभागात त्याची नोंद नसल्याचे सांगितले जाते.
नुकताच मुरबाड तालुका या संकटातून कोरोनामुक्त झाल्याचा आनंद मुरबाडवासी उपभोगणार, तोच त्यावर नव्या रुग्णाचे विरजण आधीच तय्यार होते. शारीरिक प्रकृतीच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एका रुग्णाचे चक्क कोरोना टेस्ट अनपेक्षितपणे पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण उभे राहायला सुरुवात झाली आहे. सदर रुग्ण ही अंदाजे ७० वर्षीय महिला असून मुरबाड तालुक्यातील कोंडेसाखरे येथील ती रहिवासी आहे. वयोमानानुसार तिला अन्य शारीरिक व्याधी असल्याने अनेकदा उपचारासाठी विविध दवाखान्यांकडे न्यावे लागते. याच दरम्यान तिला इन्फेक्शन झाला असल्याचा अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 'हा छुपा बॉम्ब नेमका आहे कुठे?' या प्रश्नाने मुरबाडच्या आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढवले. तर आता मुरबाडकरांनी पुन्हा एकदा सावध राहण्याची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट आहे.
मात्र या नव्या रुग्णामुळे तालुक्याच्या कोरोन्टाईन आकडेवारीत वाढ झाली असून नव्याने १४ व्यक्तींची भर पडली आहे. पैकी २ डॉक्टर असून मागील आकडेवारी धरून सद्यस्थितीला तालुक्यात एकूण ६७ संशयित होम कोरोन्टाईन आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोन्टाईनमधून रजा मिळालेल्या व्यक्तींचा आकडा २८१ वर पोहचला आहे. तसेच काल (दि. १८ रोजी) कोंडेसाखरे येथील १० लोकांचे स्वॅब ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित आज पाठवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
9 Comments
वासिंद शहर आज पासून ८ दिवस कडक बंद ठेवण्यात आले आहे तसेच आपल्या हितासाठी मुरबाड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात यायला पाहिजे.
ReplyDeleteचांगली सूचना... धन्यवाद सर सुचने बद्दल🙏🏻
Deleteमहत्वाची माहिती किशोर सर
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
Delete👍👍👍
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
DeleteGood work kishore sir...
ReplyDeleteधन्यवाद🙏🏻
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete