हेरा फेरी ३ मध्ये संजय दत्त अंध खलनायकाच्या भूमिकेत
![]() |
| Hera Pheri 3 Shooting Started (Source: Instagram) |
गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी चित्रपटाच्या पुढील सिक्वेल 'हेरा फेरी 3' बद्दल माहिती समोर येत आहे. असा सांगण्यात येत आहे की या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची कॉमेडी चा आनंद मिळणार असून आता याबाबत आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची एन्ट्री झाली असून तो विलन च्या भूमिकेत दिसणार असल्याचा सांगण्यात येत आहे. संजय दत्त अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे ही बोलले जात आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत एक ट्विस्ट आहे. संजय दत्तच्या एंट्रीमुळे हा चित्रपट अधिक रंजक होणार आहे. श्याम, राजू आणि बाबूराव यांच्यासोबत संजय दत्त कोणत्या युक्त्या खेळतो हे पाहावे लागेल!
गेल्या वर्षी 'KGF 2' मध्ये रॉकी भाई विरुद्ध अप्रतिम भूमिका साकारली होती. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या चित्रपटातही त्याने कमाल केली होती. आता पुन्हा एकदा तो नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. अशीही बातमी आहे की, संजय दत्तशिवाय अर्शद वारसीही 'हेरा फेरी 4'मध्ये दिसणार आहे.
'हेरा फेरी 4' बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे शूटिंग पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. मुंबईशिवाय परदेशातही चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. Abu Dhabi, Dubai आणि United States मध्ये शूटिंग करण्याची मेकर्सची योजना आहे. बाबू भैय्या, राजू आणि श्याम परदेशात जाऊन जागतिक स्तरावर चाली खेळताना दिसतील अशा पद्धतीने चित्रपटाची कथा लिहिली आहे.

0 Comments