येरवडा येथे प्रथमच तृतीय पंथ यांची मतदान नाव नोंदणी मोहीम

येरवडा येथे प्रथमच तृतीय पंथ यांची मतदान नाव नोंदणी मोहीम

येरवडा भागात एक आगळी वेगळी मोहीम आज राबवण्यात आली जी खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्यात सर्वात महत्त्वाचा व हक्काचा म्हणजे मतदान ओळकपत्र याच्या नोंदणीचे काम हाती घेतले होते पण सर्वात चांगली गोष्ट ह्यात ही होती की ही मोहीम खास तृतीय पंथानं साठी होती. येरवडा येथे प्रथमच तृतीय पंथ यांची मतदान नाव नोंदणी मोहीम चांगल्या रित्या पार पडली.



मा.अनवर मेहमूद पठाण (भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, पुणे शहर.
मा.अनवर मेहमूद पठाण (भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, पुणे शहर)

मा. जगदीश मुळीक (अध्यक्ष भाजपा पुणे शहर)(, यांच्या  मार्गदर्शनाखाली मा.अनवर मेहमूद पठाण (भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, पुणे शहर.) यांच्या पाठपुराव्याने निवडणूक अधिकारी मा. स्मिताजी कुलकर्णी (नायब तहसीलदार ) यांच्या सहकार्याने येरवडा भागातील समाजाचा एक अविभाज्य घटक असलेले सर्व तृतीय पंथ यांचे विशेष मतदान नाव नोंदणी करण्यात आले. यावेळी आमचे मा. अनवर मेहमूद पठाण यांच्या शब्दाला मान देऊन आलेल्या निवडणूक आयोगाचे मा. स्मिता कुलकर्णी यांचा आणि तृतीय पंथ समुदायचे प्रमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हे करताना यावेळी अनवर पठाण यांचे सहकारी वर्ग कदीर शेख, फैय्याज शेख, अमित कदम, लक्ष्मण गायकवाड, जिलानी शेख, सिराज शेख, शफिक शेख यांच्या सहकार्याने अनवर पठाण यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालय, लक्ष्मीनगर येथे पार पडला.

आयोजित कार्यक्रमाचं व्हिडिओ खाली पाहा:



0 Comments