येरवड्यात मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा; मेट्रोच्या खड्ड्यात नागरिक पडून सुदैवने बचावला

येरवड्यात मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा; मेट्रोच्या खड्ड्यात नागरिक पडून सुदैवने बचावला




मेट्रोच्या खड्ड्यात नागरिक पडून सुदैवने बचावला


येरवडा येथील  मेट्रोचे काम सुरू असताना मोठमोठे घेण्यात आलेल्या खड्डे याला कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसताना एक नागरिक बारा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात पडला. 
ते त्याच्या जीवावर बेतले होते. वेळीच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे  व सहकारी यांच्या निदर्शनासंदर्भात आले असता तत्काळ शिडी व रशीच्या साह्याने त्या पडलेल्या नागरिकाला बाहेर काढण्यात यश आले. यावरून असे सिद्ध होते, की सदर परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली जात नाही.

मेट्रोच्या खड्ड्यात नागरिक पडून सुदैवने बचावला 1


 

 वरच्या बाजूला काम सुरू असताना जाळी मारली जात नाही. त्यामुळे वाहतूक सुरू असताना वरून काही ना काही सतत पडत असते, हेही नागरिकांच्या जीवित आला धोक्याचे आहे. नुकतेच वर काम सुरू असताना एक जॅक सुद्धा खाली रस्त्यावर पडला होता, परंतु सुदैवाने कोणालाही त्याची इजा पोचली नाही.


सदर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना कुठलेही अधिकारी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, खासदार, आमदार याच्या सुरक्षेबद्दल अवाक्षरही बोलत नाही. त्यांना नागरिकांच्या जीवाचे काहीही घेणे देणे नसल्याचे यावरून जाणवते. 

असेच जर मेट्रो प्रकल्पाने हलगर्जीपणा केला, तर नक्कीच नागरिकांच्या जीवला धोका पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मेट्रो प्रकल्पाने तत्काळ काम सुरू असताना सर्व प्रकारची सुरक्षेची खबरदारी घ्यावी व ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे केलेले आहेत त्या त्या ठिकाणी लावून सुरक्षा रक्षक तैनात करावा  जेणेकरून भविष्यात कोणाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही, अन्यथा संबंध येरवडा परिसरातील रहिवासी व नागरिकांच्या वतीने मेट्रो प्रकल्पाचे काम बंद पाडले जाईल, याची मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, ही विनंती.

(Note : सदर बातमी प्राप्त माहितीवरून प्रसारित करण्यात आली आहे)
प्रतिनिधी : 
मोहसीन

हे हि वाचा


असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 

0 Comments