मा. अनवर भाई पठाण यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]() |
| अनवर पठाण नागरिकांशी संवाद साधताना |
येरवडा येथे मा. अनवर पठाण (भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष, पुणे शहर) यांनी सामान्य नागरिकांन करता वीज, पाणी व सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार चे आयोजन केले. त्यात जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
नेहमी प्रमाणेच त्यांच्या कार्यालय येथे जनता दरबार मध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले. मा. अनवर पठाण यांच्याशी संवाद साधल्या नंतर त्यांनी सांगितले की "जनता दरबार च्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांच्या हक्काच्या माणसाला प्रत्यक्षपणे त्यांचे प्रश्न सांगण्याची संधी मिळावी व संबंधित प्रश्न योग्य त्या अधिकाऱ्याच्या मदतीमार्फत सोडवण्यात यावे" त्यांच्या ह्या उपक्रमाला नेहमी प्रमाणे चांगल्या प्रतिसादामुळे नागरिकांचे आभार मानले सोबत शासकीय प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा आश्वासन ही दिले.
आतापर्यंत सोडविण्यात आलेल्या प्रश्नांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रेशन कार्ड. अनेक नागरिकांचे रेशन कार्ड संबंधित प्रश्न रेंगाळत पडले होते परंतु मा. अनवर पठाण यांच्या अथक प्रयत्न नंतर जे वर्षणू वर्ष रेशन कार्ड मिळत नव्हते ते अखेर मिळाले. नागरिकांनी देखील मनापासून अनवर भाई पठाण यांचे आभार मानले.
व्हिडिओ ही पाहा :


0 Comments