"शिवळे येथील कोविड सेंटर अर्थात उशिरा सुचलेलं शहाणपण" -एस. एल. पाटील
मुरबाड : (दि२७) तालुक्यातील शिवळे येथे नुकताच थाटामाटात नव्याने ६० बेड्सचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून तेे उशिरा सुरू करण्यात आल्याने सोशियल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे.
मध्यंतरीच्या काळात मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या थेट शंभरी पार जात असल्याचा अहवाल समोर येत होता. मात्र बेड्स उपलब्ध नसल्याने योग्य उपचारा अभावी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागण्याचे बोलले जात आहे. अशातच शिवळे येथे नव्याने सुरु झालेले कोविड केअर सेंटर जर योग्य वेळी दखल घेऊन सुरू केले असते तर तालुक्यात रुग्णांची ससेहोलपट थांबली असती, अशा प्रतिक्रिया सोशियल मीडियावर उमटतअ असतांना या प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष एस. एल. पाटील यांनी 'उशिरा सुचलेलं शहाणपण' अशा शीर्षका खाली चक्क विद्रोही कवितेचं लिखाण करून सोशियल मीडियावर वायरल केले आहे. आणि या कवितेला अनेक नेटकाऱ्यांनी दुजोरा ही दिला आहे.
याबाबत अनेकांनी विविध मते व्यक्ती केली असून पाटील यांनी त्यांच्या कवितेतून सदर कोविड सेंटरचे पितळ आणि मुरबाडकरांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
"गेल्या काही महिन्यांत मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येने कमालीचा आकडा गाठला होता. आवश्यक औषधांचा तुटवडा, ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा अभाव, अपुरी आरोग्य यंत्रणा यांमुळे अनेकांना यात आपला जीव गमावला लागला. मात्र असे असतांना श्रेय लाटी व प्रसिद्धीसाठी थाटामाटात आमंत्रणे देऊन उद्घाटन केलेले शिवळे येथील कोविड सेंटर जर वेळेत सुरू केले असते तर कदाचित अनेकांचा जीव बचावला असता. परंतु फक्त शिवळे येथे कोविड केअरची बाब एवढ्या उशिरा सुचावी, ही ठाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांना अशोभनीय आहे."
-एस. एल. पाटील, अध्यक्ष -प्रहार जनशक्ती पक्ष,मुरबाड




0 Comments