मुरबाड : उद्भवणाऱ्या गावतंट्याना टाळण्यासाठी काँग्रेसचा प्रभावी 'नुस्का' [ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : उद्भवणाऱ्या गावतंट्याना टाळण्यासाठी काँग्रेसचा प्रभावी 'नुस्का' 


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २) गावांतर्गत वादविवाद, तंटे टाळण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी एक नियोजनबद्ध मागणी केली असून याची अंमलबजावणी झाल्यास गावंतंट्यांचा उद्भवणारा गंभीर प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
  पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींच्या अंगणवाड्यांमध्ये सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनीसेविका या पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज स्विकृती नंतर छाननी केली जाऊन ज्या अर्जदारांना दहावी मध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुण आहेत, त्या सर्वांचे अर्ज ग्रामसभेसमोर ठेवले जातील व तद्नंतर ग्रामसभा योग्य अर्ज स्वीकारेल. 

  मात्र सदरील प्रक्रिया सदोष असून परिणामी भरती असलेल्या गावामध्ये मोठ्याप्रमाणात गावतंटे होऊन हाणामारीचे प्रकार देखील घडण्याची संभावना आहे. तसेच सरपंच-कमिटी योग्य व सक्षम अर्जदार डावलून त्यांच्या मर्जीच्या अर्जदाराला प्राधान्य देऊ शकते, अशा अनेक कारणांंमुळे सदरील सदोष भरती पध्दत तात्काळ रद्द करावी व बिगर पेसा ग्रामपंचायत मधील भरती पध्दतीची अंमलबजावणी करावी, अशी सूचना तथा मागणी पर्यावरण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी महिला व बाल विकास मंत्री नामदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. तर या मागणीचा गंभीरपणे विचार केल्यास गावांतर्गत घडून येणारे तंटे टाळले जाऊ शकतील, असा विश्वास चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केला आहे.

किशोर गायकवाड )
___________________________________________

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments