मुरबाड : दसऱ्याच्या दिवशी 'या' गावात रावणाचे झाले मनोभावे पूजन...! - Kishor Gaikwad


मुरबाड : दसऱ्याच्या दिवशी 'या' गावात रावणाचे झाले मनोभावे पूजन...!

[KISHOR K. GAIKWAD]
Worshipping Ravana in Murbad

मुरबाड (दि. २६) : दरवर्षी दसऱ्याच्या दिनी सर्वत्र रावण दहन होत असतांना मुरबाडच्या एका दुर्गम गावात मात्र रावणाचे मनोभावे पूजन करण्यात आले आहे.
Worshipping Ravana in Murbad

  'रावण' हा गोंड या आदिवासी जमातीमधला असून  आदिवासी लोकांनी रावणाला 'आदिवासी महात्मा रावण' असे मान्य करून दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करण्या ऐवजी त्याचे पुजन करावे, असे या समाजातील लोकांचे म्हणणे आहे. याचेच अनुकरण म्हणून मुरबाड तालुक्यातील हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'वाल्हिवरे' या गावात काल दसऱ्याच्या दिवशी  'आदिवासी महात्मा रावण' यांची मनोभावे पुजा करण्यात आली.
 यावेळी गावचे सुशिक्षित, सेवाभावी सरपंच रघुनाथ खाकर, राजेंद्र आसवले सर, गणपत शेळकंदे तसेच गावातील सर्व तरुण मंडळी यांच्या नेतृत्वाखाली रावण पूजेचा हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रावणाच्या प्रतिमेचे सर्व गावकऱ्यांनी अगदी मनोभावे पुजन करून गावातील काही आदिवासी पुरुष-महिलांनी विविध प्रकारचे पारंपारिक आदिवासी नृत्य ही सादर केले. या उसत्वाला उपस्थित राजेंद्र आसवले सर यांनी सर्व ग्रामस्थांना रावणाच्या महात्म्या बद्दल माहिती देऊन "रावण हा आदिवासी समाजाचा खरा महात्मा असून संपूर्ण आदिवासी समाजाने येथून पुढे महात्मा रावणाची पुजा करावी" असे आवाहन केले. तर "आज अनेक राज्यात जिल्ह्यात व तालुक्यात महात्मा रावण यांची पुजा साजरी होत आहे. परंतु मुरबाड तालुक्यात आपण प्रथम साजरी करत आहोत. सुरूवातीला विरोध होईल परंतु सत्य असल्यामूळे आज ना उद्या ते संपूर्ण आदिवासी समाजाला स्विकारावे लागेल." असे प्रतिपादन सरपंच खाकर यांनी गावकऱ्यांना संबोधित करतांना केले. 
  
  मात्र मुरबाड सारख्या तालुक्यात जेथे वर्षानुवर्षे रावणाचे सार्वजनिक दहन केले, अशा प्रथेवर चालणाऱ्या भागात या गोष्टींना कितपत स्वीकारले जाते? हे काळात स्पष्ट होईल.
किशोर गायकवाड )
___________________________________________




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments