#दोष? [ KISHOR K GAIKWAD ]

justice for Manisha


#दोष?  

[ KISHOR K GAIKWAD ]

  मागील काही वर्षांच्या वृत्तपत्रांना नुसतं डोळ्यासमोर जरी धरलं तरी या देशातील कित्येक लेकींच्या आर्त आरोळ्या ऐकू येतील. कोरोनावर आज नाहीतर उद्या लस मिळेलच; पण या वासनेच्या व्हायरसचं काय? वर्षानुवर्षे हा व्हायरस या देशातील आया-बहिणींच्या देहाचे लचके तोडण्यात यशस्वी झाला आहे. सांगा, हे आपल्या देशाचं अपयश नव्हे का?

  आज ही अशा नीच प्रवृत्ती माझ्या देशात अस्तित्वात आहेत आणि त्यांना पोसण्याचे काम चक्क आम्हा जनतेच्या पैशातूनच प्रामाणिकपणे केलं जातंय? त्यामुळे यातून होणारा मनस्ताप आता सहन होत नाही. 
  
 अनेक सरकारी यंत्रणा येथे उपलब्ध आहेत. लोकशाहीचा ही गवगवा केला जातोय. देशाला स्वयंघोषित 'महान' ही पदवी ही बहाल आहे. तरी येथील आया बहिणी सुरक्षित नाहीत? मग याला जबाबदार कोण???
 
  टीव्ही चॅनेल्स वाल्यांनी तर या घटनांना आपल्या टीआरपीचा चांगलाच खुराक करून ठेवलाय? नेते मंडळी मूग गिळून गप्प? पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी हाताची कठपुतली झाल्या सारखी भासते? आता न्यायव्यवस्थेवरच सर्वकाही अवलंबून... कारण बाकी सगळं काही संभ्रमातच...

देश मात्र तोच आहे,
फक्त जागा बदलली...
विकृती ही तीच आहे,
आज चेहरे बदललेत...
अरे लेक ही तीच आहे,
जन्मदातेच बदललेत...
अन् वेदना ही त्याच आहेत,
फक्त शरीर बदललंय...
आर्त आरोळ्या ही वेगळ्या नव्हत्याच,
बस कंठच बदललाय...
फरक निव्वळ दिनांकाचा आहे,
पण घटना मात्र तीच आहे...
फरक फक्त नावांचा,
वासना मात्र तीच आहे...I
काल जस्टीस फॉर असिफा होतं,
आज जस्टीस फॉर मनीषा आहे...
निदान आता तरी जागे व्हा झोपलेल्यांनो,
अन्यथा पुन्हा परवा कोण आहे?

     लचके तोडले देहाचे;
     कसला हा रोष आहे?
     जन्म घेतला येथे मुलीचा;
     हाच आमचा दोष आहे?
     हाच आमचा दोष आहे?
           -किशोर गायकवाड

 ______________________________________________

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments