मुरबाड | कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रामा केयर सेंटरचे उद्घाटन - वाचा : मुरबाडच्या कोरोना रुग्ण संख्येत २ ने वाढ - [ आपलं ओरिजिनल आधार कार्ड हरवलं असेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तरीही ओरिजिनल आधार कार्ड मागवा घरच्या पत्त्यावर पोस्टाने फक्त ५० रु. मध्ये... ] - ( किशोर गायकवाड )

मुरबाड (दि. ९) : मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येने शतक पार केला असतांना या रुग्णांना उपचारासाठी तालुक्या बाहेर मोठ्याप्रमाणात फरफट सहन करावी लागत आहे. याबाबत काही पत्रकारांनी बातम्यांमधून या पिढीत रुग्णांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानुषंगाने या मागणी संदर्भात काही राजकीय पत्रव्यवहार ही करण्यात आले होते. याची दखल घेत आरोग्य यंत्रणा जलदगतीने कामाला लागून आज मुरबाड शहरात कोविड सेंटरचे कामकाज सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

  मुरबाडच्या शासकीय रुग्णालया शेजारी ट्रामा केयर सेंटरचे रखडलेले काम नजरेस पडत होते. आज त्या ठिकाणी एकूण ७५ बेड्स आणि २ व्हेंटिलेटरची व्यवस्थाकरून कोविडच्या रुग्णांना उपचार दिला जाणार आहे.
  याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांनी दिनांक २ जुलै रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लेखी निवेदन देऊन मुरबाडमध्ये कोविड सेंटरची मागणी केली होती. तसेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दि. ३ जुलै रोजी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र देऊन कोविड केयर सेंटर चालू करण्याबाबत विनंती केली होती.
  
  आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग, राजकीय मंडळी उपस्थित होती. तर उद्घाटनाच्या बडेजाव मध्ये उपस्थितांकडून सोशियल डिस्टन्सींगचा पुरता फज्जा उडालेला पहावयास मिळाला. 
  कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून मुरबाडच्या शासकीय रुग्णालया शेजारी ट्रामा केयर सेंटरचे काम सुरू होते. संबंधित ठेकेदाराच्या अडचणीमुळे सदर कामाला विलंब झाल्याचे बोलले जाते. याठिकाणी सुसज्ज हॉस्पिटलचे नियोजन असतांना ७५ बेड्सच्या सेटअपचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी कोविड रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुरबाडकर ज्या अपेक्षेने या ट्रामा केयर सेंटरच्या प्रतीक्षेत होते, तसे न होता त्याचा उपयोग सद्या कोविड युनिटसाठी होणार आहे. मात्र असे असले तरी कोरोना आजरापेक्षा मुरबाड तालुक्याबाहेर त्याचा उपचार जीवघेणा असल्याच्या ज्या तक्रारी कानावर येत होत्या, त्यांना आता काही अंशी पूर्णविराम बसणार आहे.

   या कार्यक्रमाला सन्मानिय उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांचा नाव फलकावर असतांना ठाणे जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली नाही. जिल्ह्यात सद्या जमावाला तथा कार्यक्रमांना बंदी असल्याचा खुद्द ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश आहे. मात्र असे असतांना मुरबाडमधील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पडल्याने सदर कार्यक्रमात शासनाच्या नियमांना महत्त्व दिला नसल्याची चर्चा आहे.
  
   मुळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरबाडमधील वातावरण पाहता या उद्घाटन सोहळ्याची औपचारिकता अनावश्यक आहे. रुग्णांना सद्या उपचारासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. बडेजाव करण्याची ही वेळ नाही. मुरबाड मधील रुग्णांच्या आजारपणाला प्रसिद्धीचा माध्यम करणाऱ्या या फेस्टिव्हलची वेगळीच चर्चा जोर धरत आहे. 

----------------------------------------------------------------------
मुरबाड : आजचे कोरोना अपडेट्स!

आज दोन रुग्णांची भर...

१) शहर-  वय ५२ वर्षे पुरुष (अंजनी गॅसच्या मागे)

२) तोंडली - वय २४ वर्षीय महिला

एकूण रुग्ण संख्या = १३६

--------------------------------------------------------------------
  आपलं ओरिजिनल आधार कार्ड हरवलं असेल आणि मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तरीही ओरिजिनल आधार कार्ड मागवा घरच्या पत्त्यावर पोस्टाने फक्त ५० रु. मध्ये...

घरबसल्या  मोबाईलवरून ओरिजिनल आधार कार्ड मागवण्याची प्रोसेस जाणून घ्या खालील लिंकवर. 

http://internetpointshashi.blogspot.com/2020/07/httpsresident.html

-------------------------------------------------------
[ काही मदत लागल्यास खालील नंबरवर संपर्क साधा ]

शशी इंटरनेट पॉईंट
स्वामी विवेकानंद शाळेसमोर ,मुरबाड
८९७५१८०३०४ / ८३६९२५११६८
-------------------------------------------------------
१५ मिनिटात अर्जंट पॅनकार्ड PDF कॉपी : http://internetpointshashi.blogspot.com/2020/07/blog-post.html

१५ वी ( पदवीधर कोणत्याही शाखेतील) पास  विद्यार्थ्यांसाठी बँक भरती ९६३८ जागा : http://internetpointshashi.blogspot.com/2020/06/graduate.html

आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंकिंग अंतिम मुदत : १५ जुलै २०२० :  - http://internetpointshashi.blogspot.com/2020/06/httpswww1.html

महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे  या संस्थेमार्फत मार्फत एम.पी.एस.सी.परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग :  http://internetpointshashi.blogspot.com/2020/07/mpsc.html
-------------------------------------------------------
आमच्याकडील इतर सेवा
१) पॅन  कार्ड 
२) पासपोर्ट 
३) गॅझेट ( नावात बदल ) 
४) एम्प्लॉयमेंट नोंदणी 
५) सर्व प्रकारचे सरकारी भरती फॉर्म
६) स्कॉलरशिप फॉर्म 
७) सर्व प्रकारचे CET अँप्लिकेशन फॉर्म 
८) PF ची कामे 
९) जात पडताळणी फॉर्म 
१०) सर्व प्रकारचे कॉलेज ऍडमिशन फॉर्म 
----------------------------------------------------------

Murbad
    
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


 

0 Comments