आज मी पुन्हा पाहिले..!



कोरोनाच्या या #वैश्विक_पुरात हरवलेल्या एका कुटुंबाला #त्याच नाक्यावरून आपल्या जन्मभूमीकडे जातांना; आज मी पुन्हा पाहिले..!

निर्मनुष्य रस्ता अथवा अज्ञानामुळे वाट चुकली, म्हणून न डगमगता चालणाऱ्या त्या हिम्मत भरल्या #पायांना; आज मी पुन्हा पाहिले..! आशेच्या श्वासाने #फुत्कारणाऱ्या त्या नाकपुड्यांना; आज मी पुन्हा पाहिले..! धीर खचविणाऱ्या आग ओकत्या सुर्याशी आत्मविश्वासाने लढणाऱ्या त्या #डोळ्यांना; आज मी पुन्हा पाहिले..!

होय, आज मी पुन्हा पाहिले; अस्तित्वाची शर्यत जिंकण्यासाठी खाचखळग्यांनी भरल्या रस्त्यावरून धावणाऱ्या त्या #भुकेला, आज मी पुन्हा पाहिले..!

"परिस्थितीने समोर वाढलेल्या जीवनाच्या वाटेवरील #अडथळे जे झुंज देत पार करतात, त्यांना अन्य कोणत्याही शाळेची अथवा अनुभवाची आवश्यकता नसावी? जणू #चावी दिलेल्या #खेळण्याप्रमाणे चक्क कर्नाटकात पायी निघालेली ही संसारं, निर्मनुष्य रस्ते अथवा भौगोलिक ज्ञानाच्या आभावामुळं म्हणा; #वाट_चुकली अन् मुरबाड दर्शना करीता पोहचली! जन्म घेतला; ती भूमी, ते घरंच आज यांना दिसेनासं झालंय!

महामारीच्या या #वैश्विक_महापुरात घरची वाट शोधतांना मुरबाडमध्ये वाहून आलेल्या आशावादी कुटुंबांपैकी हे एक..! त्यांच्या उर्जेला, असामान्य धडसाला सलाम!"

#वैश्विक_पूर!

वाटेवरच्या खड्ड्यांनी,
सुकल्या फोडांना पिकविले,
झुंज देत्या पायांना,
 #झेप घेण्यास शिकविले,

 घामाने भिजली काया,
उष्णतेने जळत जाई,
श्वासाने भरला उर,
 ठोक्यां संगे पळत राही!

पटरीवर धावती जिंदगी,
थांबा कोणता #वळंत नाही,
पाय शोधती वाट घराची,
 अन् डोळ्यांना #खुणा कळंत नाही!

घरटं आमचं चोरलंय कोणी?
कोण्या ढगांनी ते झाकलंय?
संपता संपेना अंतर हे कोणी;
 आणून #पायाखाली टाकलंय?

वाहून गेली लाखों कुटुंबं,
कोरोनाच्या या #वैश्विक_पुरात,
आता नव्याने उगवेल काय?
 धडधड ती कायम उरात!
धडधड ती कायम उरात!
            -किशोर गायकवाड

0 Comments