लढेंगे! जीतेंगे! कोरोना से...






【लेख जरा मोठा असेलही, पण सद्याच्या कोरोना सापेक्ष सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय व वैद्यकीय परिस्थितीवर संदिग्ध अग्रलेखाचा हा छोटासा प्रयत्न; शक्य तितका डोळ्यारुन घालवून प्रगतीसाठी अभिप्राय द्यावा ही विनंती..】

#लढेंगे! #जीतेंगे!

   चीनच्या वूहान शहरामध्ये बाळंत झालेल्या कोरोना व्हायरसने अक्राळविक्राळ रूप धारण करून अवघ्या जगाला आपल्या मगरमिठीत घेण्याकडे वाटचाल केलेली दिसून येत आहे. देशातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या काळजाचा ठोका चुकवीत आहे. वणव्या सारखा पसरत असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाला झुंज देण्यासाठी वैद्यकीय सैन्य, पोलीस दल मात्र अहोरात्र तैनात आहेत. तर शास्त्रज्ञांचे याबाबत कसोशीने प्रयत्न सुरू असतांना देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काही नागरिक आपली सामाजिक पथ्ये पाळण्यात हयगय करीत आहेत, असे म्हणावे लागेल. 
   
  त्यातच सोशियल मीडियावर कोरोनाचा जोरदार खप सुरू असल्याचे भासत आहे. नेटकरी अहोरात्र इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन कष्ट उपसत आहेत. अफवांचा तुटवडा नाही. करमणुकीसाठी 'ऑनलाईन_कोरोना' जवळपास अव्वल क्रमांकावर पोहोचवला आहे. तर प्रसार माध्यमांना आयता खुराक उपलब्ध झाला आहे. गुणाकार पध्दतीने जगात पसरत असलेल्या कोरोनाच्या कोविड- १९ विषाणूच्या संक्रमणाला नियंत्रणात आणण्यासाठी गंभीरपणे दक्ष राहणे नितांत झाले आहे.
  
  शाळा, अनावश्यक शासकीय कार्यालये, खाजगी तथा शासकीय प्रवासी सेवा, औद्योगिक कारखाने, हॉटेल्स, सिनेसृष्टी, धार्मिक तीर्थक्षेत्र तसेच अनावश्यक दुकानांना टाळेबंदीचा हुकूम जारी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच संचारबंदी आदेश लागू करण्याची परिस्थिती ओढवली आहे. वस्तुस्थितीत_दैनंदिन_मॅरेथॉन जीवन जगणाऱ्या मुंबईकरांनी कधी नव्हे तो विश्रांतीचा धर्म स्वीकारला आहे. रस्त्यांवर, गावागावात, गल्लीबोळात स्मशान शांतता पसरले. उद्या नव्याने काय समोर वाढले जाईल, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते की काय? या भीतीने सरकार आणि प्रशासनाची झोप उडवले. परिणामी अनेक अनपेक्षित निर्णय तातडीने घेत जात आहेत. पर्यायाने पोलिस व वैद्यकीय सेवकांवर सर्वाधिक ताण व जबाबदारी येऊन ठेपेले.  रोज #नवनवीन_पैलू समोर येत आहेत. अचानक वळण घेणाऱ्या परिस्थितीमुळे अनपेक्षित निर्णय, आदेश निर्गमित केले जाऊ शकतात, तेव्हा सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. 
  
   लोकवस्तींमधून, मांसमच्छिच्या दुकानांतून, लहानमोठे हॉटेल्स, कँटीन्सकडून उकिरड्यावर टाकल्या जाणाऱ्या अनावश्यक अन्नावर जीवन व्यथित करणाऱ्या भटक्या जनावरांवर या विषाणूमुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे.कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणारे, हंगामी पिकांची लागवड केलेले शेतकरी, हातावर पोट भरणारे, छोटे व्यावसायिक, आदिवासी मच्छिमार, मोलकरणी, फेरीवाले अशा शेकडो, हजारो नागरिकांच्या कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. निश्चितच सरकारने याबाबत ही योग्य दिशेने पाऊले उचलून उपाययोजना आखणे अनिवार्य आहे. 
  
   जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका विविध व्यवसायांना ही बसला आहे. एखाद्या संसर्गजन्य रोगाईची चाहूल लागताच पहिल्या नाहक भुर्दंडाची उप्पट बसते ती चिकन व्यवसायावर! कोरोना विषाणूच्या संभाव्य प्रादुर्भाचा सर्वात मोठा फटका चिकन पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर अन्य मांस विक्रेते ही अडचणीत असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोरोना व्हायरसमुळे धास्तावलेले नागरिक चेहऱ्यावरचे मास्क तसेच हँड सॅनिटायजर खरेदीसाठी विविध मेडिकल स्टोअर्सवर धाव घेत आहेत. अल्प प्रमाणात उपलब्ध होणारी औषधे, सॅनिटायजर तसेच जीवनावश्यक वस्तूंचा गरजे पेक्षा अधिक साठा करणे टाळा. आपले शेजारी, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना ही त्या गोष्टींची आवश्यकता आहे. निव्वळ आपल्याकडेच सॅनिटायजर म्हणा, मास्क म्हणा या गोष्टी असणे पुरेसे असल्याची भावना नाकारा. अन्यथा #अपेक्षित_हेतू साध्य होणे अशक्यच! भरमसाठ मागणी आणि खप वाढल्याने या वस्तूंचा तुटवडा भासू लागला असून यातून मास्कच्या किंमती दामदुप्पट तर बनावट सानिटायजर उत्पादनांच्या घटना ही समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीने मेडिकल मार्केट तेजीत आणल्याचे म्हणावे लागल्याची वेळ आली असून याबाबत अधिक दक्ष राहावे लागेल.

   एका विषाणूने संपूर्ण मानवसृष्टीला हाताची कठपुतळी बनवलेय. पृथ्वी फिरत असली, तरी जग मात्र थांबलेय! प्रगतीच्या तुलनेत भारत बहुतेक काही वर्षे मागे येत ही असेल, परंतु लांब झेपे करीता दोन पाऊले माघार घ्यावीच लागते हा सूत्र विसरता कामा नये. महामारीने गुन्हेगारीला आटोक्यात आणले असले तरी मानवी अस्तित्व धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचतोय की काय? या विवंचनेत राष्ट्र दिसतात. जणू अंतरंगीय युद्धाचे स्वरूप सर्वदूर निर्माण झाले आहे. तर या जैव_युद्धात खेळ बुद्धिबळाचा सुरू झालाय. आपला एक ही प्यादा गमावता कामा नये. शत्रू अदृश्य आहे. युद्ध शीत आहे. येथे संयमाच्या हत्याराचा वर्मी घाव अपेक्षित आहे. 

   मानवी शरीरात विविध प्रकारचे आजार अंतर्भूत असून उक्त शारिरीक प्रतिकार स्थिती अनुसार काही वेळेस ते अनपेक्षितपणे उभारून येत असतात. आपण आजारी असल्याच्या विचाराने स्वतःला विवंचनेत मानणाऱ्या सदृढ व निरोगी व्यक्तीला त्याच्या ध्यानी बसलेल्या आजाराचे प्रत्यक्षात निदान होणे साहजिकच असल्याचे म्हंटले जाते. अशातच आलेला कोरोनाचा महासंकट हानिकारक ठरू शकतं. अनेकांनी याच्या वाढत्या आलेखाचा धसका घेतला असावा. परिणामी एखादी शारीरिक-मानसिक #रोगराई आपल्याकडे आकर्षित होण्याची संभावना अथवा शरीरात एखादी व्याधी निर्माण होण्याची संभावना नाकारता येणार नाही. सबब आपण यावेळी स्वास्थ जीवनाचा विचार मनी रुजवू या व निरोगी राहण्याकडे आकर्षित होऊ या.
   
   देशावर छातीठोकपणे आलेले विदेशी संकट आणखीन बळावत असतांना सुजाण नागरिकांनी आपली संविधानिक जबाबदारी स्वीकारून ती निष्ठेने पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक नियोजन काटेकोरपणे करा. पैसे, अन्नधान्य सांभाळून वापरा. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला यांची अधिक काळजी घेणे तथा त्यांना संरक्षण देण्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. या साखळी विषाणूला आपल्या पर्यंत पोहचू न देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना जगभरात प्रसारित केल्या गेल्या असून तितकेच कसोशीने त्यांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. 
   
    एका विदेशी_पाहुण्याने अवघ्या देशाची यंत्रणाच नियंत्रित केल्याचे चित्र सर्वदूर पसरले आहे. रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल्स, रेल्वे-बस स्थानके, विमानतळे, तिर्थालये, शिक्षण मंदिरे, कार्यालये निर्मनुष्य केलीत. हजारो आस्थापने टाळेबंद केली. वर्दळीची ठिकाणे रिकामी केली. ध्वनीनाद नीरव केला. अनेक तलवारी म्यान केल्या. माणसाला स्वतःच्याच घरात बंदी केला. दुर झालेल्या कुटुंबाशी स्वतःला जोडायला भाग केला. माणसाल्या माणसाला जागा केला. गुन्हेगारीच्या घटनांचा आकडा वधारला. होय; एक पर्व बदलतोय! ही शिकवण असू शकते. भविष्याचा धोका ओळखण्याचा संकेत ही असेल. आता देशाला खरी गरज आहे ती, राष्ट्रसंत_गाडगेबाबांच्या_विचारांची! बाबांनी या देशात स्वच्छतेचा महामंत्र दिला. त्यांना रोगराई मुक्त राष्ट्राची अपेक्षा होती. मात्र आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतोय? असे म्हणणे भाग पडत आहे. पुन्हा त्यांच्या विचारांचा वारसा स्वीकारून #स्वच्छतेची_चळवळ उभी करावी लागेल. आपल्या निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे असे जीवघेणे विषाणू घुसखोरी करतात.मानसिक-शारीरिक हानी करतात. मात्र आता यावर विचार विनिमय होऊन क्रांती घडली पाहिजे. तेव्हा या विदेशी अफजल खानासोबत स्वच्छतेने, शुद्धतेने व संयमाने लढू या आणि जिंकू या! भावी इतिहासाचे साक्षीदार होऊ या! विजय प्राप्ती पर्यंत संघर्ष कायम ठेवू या! अन्यथा येत्या पिढीला भीषण रोगराईच्या वातावरणात जन्म द्यावा लागेल व त्यांच्या कुरोगी स्वास्थास एकमेव आपणच जबाबदार असू, हे मात्र शत प्रतिशत सत्य! बाकी सद्यस्थितीची सूत्रे तुमच्या हातात, काय परिणाम? देखते हे ब्रेक के बाद!
     घरीच_राहा, सुरक्षित_राहा!
   
   

0 Comments