हम_होंगे_कामयब!
जात_ना_देखे_यह,
नाही_पुछे_धर्म!
इन्सान_ना_छुटे_कोई,
यही_है_इसका_मर्म!!
लाशों_का_बनाए_ढेर,
पेहचान_है_इसकी_यही!
स्वच्छता_का_मंत्र_जपो,
राह_चलो_सभी_सही!!
राष्ट्र_हमारा_एक_है,
करे_जो_इरादा_नेक_है!
स्वास्थ_राष्ट्र_यह_अरमान_है,
कोरोनामुक्त_भारत_का_निर्माण_है!
सद्या जगावर कोरोना नामक भयावह संकट आले आहे. अनेक देशात या व्हायरसचे संक्रमण झाले असून भारतात ही याचे अतिक्रमण होत असल्याचे प्रसारमाध्मांद्वारे समोर येत आहे. असे झाल्यास देशाला मोठ्या भिषण परिस्थितीतून जावे लागेल. तेव्हा एक दक्ष नागरिक म्हणून देशाच्या स्वस्थपूर्ण विकासासाठी आपण स्वतः एक पाऊल पुढे येणे आता गरजेचे आहे.
सरकार याबाबत मोबाईल फोन म्हणा अथवा अन्य मार्गे जनजागृती करीतच आहे. तर सोशियाल मीडियावर मात्र याबाबत मस्करीची फटके बाजी सुरू आहे. युपी बिहारच्या काही कलाकारांनी तर या व्हायरसच्या सदराखाली चक्क चित्र विचित्र गाणी ही निर्माण केली आहेत. भिषण रोगराईतून पैसे कसे कमवावे? याची जणू शिकवण ते देत आहेत. परंतु हा मुद्दा आता गंमतीचा अथवा करमणुकीचा राहिला नाही.
अनेक संभ्रम उभे राहतील, अफवा निर्माण होतील. अशातच देशात शांतता प्रस्थापित करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. निष्काळजीपणा न बाळगता ताप, सर्दी, खोकला अथवा अन्य शारीरिक कमजोरी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय उपचाराकडे धाव घ्यावी, हात स्वच्छ धुवावे, पचनास योग्य व स्वच्छ अन्न ग्रहण करावे, कोणत्याही शारीरिक विकाराकडे दुर्लक्ष करू नये.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात अशाच एका संकटाची भरधाव आली होती. अर्थात प्लेग! तेव्हाही देश दहशतीच्या सावटाखाली जगत होता. जगातील करोडो जिवांचा निष्पाप मृत्यू आजही प्लेगच्या नावे नोंद आहेत. एवढेच नव्हे तर या महामारीवर आधारित शालेय पाठ्यपुस्तकात चक्क धडा समाविष्ट होता. कालांतराने यावर योग्य संशोधन करून प्लेगला हद्दपार करण्यात यश आले. प्लेग सोबतच नारू, कुष्ठरोग, गोवर, पोलिओ असे विविधांगी आजार जवळपास नियंत्रणात आले आहे.
परंतु या व्हायरसवर मात करण्यासाठी अद्याप अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे संकट दुरावले नसून उलटपक्षी अधिक खबरदारीने राहण्याची आता गरज आहे.
या कोरोनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे सर्वाधिक महत्त्व जनतेला कळून चुकले आहे. यापूर्वी सामाजिक जीवनात वावरतांना जुनी जाणती मंडळी कळत नकळत बरीच काळजी घेत. स्वच्छ व रोगराई मुक्त खाद्याचे सेवन होई. शारीरिक श्रमाची कामे अधिक असल्याने व्यायाम घडून येत. रोगप्रतिकारक शक्ती अफाट होती. शेतकरी मंडळी शेतावरील डवऱ्याचे पाणी सहज पचवत असत. मात्र आधुनिकतेच्या बाजारात सद्या तितकीशी रोगप्रतिकारक क्षमता मानवी शरीरात राहिली नसल्याचा आलेख आहे. त्यामुळे मानवाचा घात करण्यासाठी हल्ली किरकोळ आजार ही कधीकधी कारणीभूत ठरतो.
सबब निष्काळजीपणा दूर सारावा लागेल. बाजारहाट खरेदी करतांना काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना जबाबदारीने वागा. घरात स्वच्छतेचे प्रमाण वाढवा. विशेष करून लहान मुले व वृद्धांना अधिक संरक्षण द्या तथा त्यांची काळजी घ्या. आरोग्य विभागाकडून दिली जाणारी सामाजिक, शारीरिक व नैतिक पथ्ये पाळा.
आजवर आपल्या राष्ट्रावर अनेक संकटे आली. मात्र यावर डगमागून न जात आपल्या पूर्वजांनी ती आव्हाने स्विकारुन परिस्थितीशी दोन हात केले. आणि हे इतिहास नोंद आहे. आपण त्याच पूर्वजांचे वंशज! कधी तरी या देशात 'हम होंगे कामयब' चा नारा दिला होता. आज पुन्हा एकदा त्याच विचारांचा झेंडा हाती घेऊन सद्भावनेची आरोळी देऊ या. व्हायरसच्या उपचाराबाबत संशोधन सुरू आहे. संशोधकांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न करू या. निश्चितपणे त्यांना यश मिळेल यात शंका नाही. तोपर्यंत एकमेकांना संशयाने न पाहता मदतीने पाहू या; आणि घाबरून न जाता जबाबदारीने वागू या!
मानवी अस्तित्वावर आलेल्या या संकटाची जाणीव बाळगून सामाजिक जबाबदारी म्हणून शब्द मशाल आपल्या अंकात यावेळी जाणीवपूर्वक हा अग्रलेख प्रसिद्ध करीत आहे. तरीही या भिषण समस्येबद्दल आरोग्य प्रशासनाला किंवा जबाबदार आरोग्यसेवकाला जनमानसात अधिक प्रबोधन करावयाचे झाल्यास अथवा या व्हायरसशी निगडित महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करावयाची झाल्यास सदर माहिती लोकसेवा म्हणून शब्द_मशाल मोफत छापेल असा विश्वास देतो..!
0 Comments