कोरोना | 'त्या' मृताचे अहवाल पॉझिटिव्ह - वाचा : मुरबाडच्या कंटेन्मेंट झोन मधील गावांची नावे - दोन दिवसांत 'या' ठिकाणी भेटले रुग्ण - मुरबाडच्या आरोग्य यंत्रणेचा अपयश - ( किशोर गायकवाड )




मुरबाड (दि. ७) : सद्या मुरबाडच्या कोरोनाजन्य स्थितीवर निव्वळ राजकारण सुरु आल्याचे भासते. मुरबाडकच्या रुग्णांना खुद्द मुरबाडमध्ये उपचाराची व्यवस्था होणे अनिवार्य आहे. तरीही दिरंगाई का होत आहे? हा प्रश्न कायम आहे. हल्ली कोरोनाच्या दहशतीने हृदय विकाराच्या घटना अधिक कानावर येत आहेत. अशातच मुरबाड बाहेर उपचार घेणे रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मानसिकतेच्या दृष्टीने घातक आहे.
  
    मुरबाडमध्ये तात्काळ उपचाराच्या शासकीय उपाययोजना न आखल्यास कोरोनाचा खाजगी बाजार मांडला जाण्याची शक्यता आहे.
  
  मुरबाडची आरोग्य यंत्रणा हल्ली हँग झाल्याचे भासत आहे. रुग्णांची संख्या आणि प्रसिद्धी अहवालातील आकडेवारी जुळता जुळत नाही. त्यामुळे नेमका रुग्ण माझ्या शेजारील तर नाही ना? या भीतीने मुरबाडच्या जनतेत आपापसात वैमनस्याचे वातावरण निर्माण होण्याची अवस्था निर्माण झाली आहे. मात्र तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आरोग्य अधिकारी याबाबतीत गंभीर नसल्याचे उघड आहे.

दि. ६ जुलै (३ रुणांची नोंद)

• सोनावळे 
• मुरबाड लॅन्डस्केप
• पारतळे

दि. ७ जुलै

मुरबाड शहर
     a) जैन मंदिराच्या मागे - वय ६० वर्षीय पुरुष
     b) साई विश्व सोसायटी - ३७ वर्षीय पुरुष (म्हसा रोड)
     c) साई संसार समोर (बस स्थानक मागे) - ६५ वर्षीय पुरुष (मूळ गाव शिरवली)
     d) हनुमान मंदिर समोर - ६२ वर्षीय पुरुष (मयत)
     e) सोनारआळी - ६४ वर्षीय पुरुष
      
• तळवली - ३० वर्षीय पुरुष
• आंबेळे (गडगे) - ३७ वर्षीय पुरुष
• म्हाडस - ६६ वर्षीय महिला (कैदी)
• उंबरपाडा - २५ वर्षीय पुरुष
• माल्हेड - 
    a) १२ वर्षीय युवक
    b) ३० वर्षीय पुरुष


मुरबाडमधील कंटेन्मेंट झोन

1) मुरबाड शहर
2) माळीपाडा
3) पोलीस वसाहत
4) तोंडलीकर नगर
5) गुरुकुल सोसायटी
6) झुंजारराव कॉम्प्लेक्स
7) हनुमान आळी
8) देवीची आळी
9) मडकेपाडा
10) माल्हेड
11) मोहप
12) सरळगाव
13) संगम
14) अस्कोत
15) वैशाखरे
16) पळू 
17) नारिवली
18) शाई
19) तळवली
20) खडकपाडा
21) आंबेळे

कंटेन्मेंट झोन मुक्त गावे/परिसर
  1) विद्यानगर (शहर)
  2) उमरोली
  3) म्हाडस
  4) कोंडेसाखरे



मुरबाड शहरातील मृताचे अहवाल पॉझिटिव्ह

  मुरबाड शहरातील हनुमान मंदिरा समोरील इमारती मध्ये राहणाऱ्या ६२ वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्ट काल सायंकाळी पॉझिटिव्ह म्हणून समोर आला. त्यांना त्रास होत असल्याने त्यांचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले होते. दि. ५ जुलै रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबाने त्यांचे शव विठ्ठलवाडी येथे नेऊन दहन केले होते. त्यामुळे शहरातील मृतांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

  यापूर्वी शहरातील हनुमान आळी येथील २२ वर्षीय युवक, सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती, अस्कोत येथील वयस्क व्यक्ती असे एकूण तीन व्यक्तींची मृत म्हणून मुरबाडमध्ये नोंद आहे. तसेच याच अस्कोत येथील वयस्क व्यक्तीच्या ५५ वर्षीय मुलाचा मुरबाड बाहेर कोरोनावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे समजते. मात्र याची नोंद मुरबाडमध्ये नसल्याचे दिसते. तर आज पुन्हा मृतांच्या आकडेवारीत वाढ आहे.
(मुरबाडच्या आरोग्य विभागाकडून प्रसारित करण्यात आलेला अहवाल)

[ वाचा : मुरबाडच्या आरोग्य विभागाच्या सावळागोंधळ वाचण्यासाठी येथे क्लिक ]


    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


make money online


 

0 Comments