मुरबाडच्या आरोग्य विभागाचा सावळागोंधळ? - रुग्णांच्या आकडेवारीतील तफावतीमुळे मुरबाडकर संभ्रमात - कोरोना आकडेवरीने केला शतक पार... - मुरबाडची आरोग्य यंत्रणा अपयशी? - ( किशोर गायकवाड )



मुरबाड : (दि. ५) मुरबाड तालुक्यात कोरोनाचा संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी मुरबाडच्या आरोग्य यंत्रणेला मात्र काही अपेक्षित यश आले नाही. परिणामी मुरबाडची कोरोना रुग्ण संख्या आज थेट शंभरी पार करून पुढे गेली आहे.

  वेळेत स्वॅब न घेणे, बाधितांशी गैरवर्तणुक करणे, फोन द्वारे संपर्क टाळणे, माहिती वेळेत प्रसारित न करणे, बरे झालेल्या रुग्णांची माहिती तथा संपर्क न ठेवणे, मोस्ट सस्पेक्टड स्वॅब घेण्यास दिरंगाई शिवाय त्यांचा पाठपुरावा करण्यास ही उदासीन अशा अनेक तक्रारी मुरबाडच्या आरोग्य अधिकाऱ्यांबाबत जनतेतून समोर येत आहेत. तेव्हा मुरबाडचा आरोग्य विभाग हलगर्जीपणाने काम करतोय का? असा सवाल निर्माण झाला आहे. याबाबत ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही अनेकदा या तक्रारी गेल्याचे समजत आहे.

  मुरबाडच्या रुग्ण संख्येचे अहवाल एका निश्चित वेळेत जाहीर करण्याची विनंती मुरबाडचे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांना मुरबाडच्या पत्रकांनी केली होती. मात्र डॉक्टरांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे भासत आहे.
  
  आज आलेले रिपोर्ट हे दोन-तीन दिवसांपूर्वीचे पेंडिंग रिपोर्ट असावेत? असा अंदाज आहे. मुरबाड तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून गेल्या ३ दिवसां पासून प्रसारित होणारी माहिती संभ्रमात टाकणारी तथा अर्धवट दिसून येते. त्यामुळे मुरबाडची नेटकरी जनता आता थेट सोशियल मीडियावरच सवाल करीत आहेत. शिवाय यातील आकडेवारी जुळत नसल्याने पत्रकारांना ही आता डोकं खाजवायची वेळ आली आहे. आरोग्य अधिकारी हे जाणीवपूर्वक करतात का? अथवा यामागचा त्यांचा हेतू काय? हे समजणे अवघड झाले आहे.

  मुरबाडचे आरोग्य अधिकारी यांनी दिनांक ४ जुलै रोजी प्रसारित केलेल्या अहवालात त्या दिवशी नवीन २ रुग्ण आणि एकूण कोरोना बधितांची संख्या ९० अशी जाहीर केली होती. मात्र आजच्या अहवालात आजचे नवीन कोरोना बाधित रुग्ण १० व आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११६ असे म्हंटले आहे. मात्र ते असे का करत आहेत? हे गणित सुटेनासे झाले आहे. (सदरचे दोन्ही प्रसिध्द अहवाल बातमीच्या खाली दिलेले आहेत)

  [ शब्द मशालचे वाचक गेल्या दोन दिवसांपासून अचूक आकडेवारीची मागणी करीत आहेत. परंतु आरोग्य विभागाच्या या सावळागोंधळामुळे ती अधिकृतरित्या प्रकाशित होऊ शकली नसल्याने खेद व्यक्त करीत आहोत. ]
  
    थोडक्यात:-
   
   दि. ३ जुलै रोजीचा अहवाल
      • मुरबाड शहर:-
 १) वय ५६ वर्षीय पुरुष (जैन मंदिरच्या मागे, सोनार आळी)
 २) वय ५६ वर्षीय पुरुष (हनुमान मंदिर समोर, मूथट फायनान्सच्या मागे)
 ३) वय ३७ वर्षीय पुरुष (संभाजी नगर- सदर व्यक्ती हा येथील स्थानिक रहिवासी नसल्याचे समजते)
 
    दि. ४ जुलै रोजीचा अहवाल
           • मुरबाड शहर
     १) वय २७ वर्षीय महिला (लँडस्केप सोसायटी, तोंडलीकर)
     २) वय ४० वर्षीय महिला (मुस्लिम मोहल्ला)

          • वैशाखरे:- 
      १) वय ३२ वर्षे पुरुष
      २) वय ४४ वर्षे महिला
      ३) वय ४८ वर्षे महिला
 
          • सोनावळे:-
      १) वय ८ वर्षे महिला
      २) वय ५६ वर्षे महिला
      ३) वय ६२ वर्षे पुरुष

     दि. ५ जुलै रोजीचा अहवाल
           • मुरबाड शहर - १
           • सोनावळे - ४
           • तळवली - २ (टोकावडे)
           • साकुर्ली - १
           • सरळगाव - १ (सदर व्यक्ती हॉटेल मालक असल्याचे समजते)
           • वैशाखरे - १

(मुरबाडमधील वांजळे गावातील- ५, धसई- १, टोकावडे ग्रामीण रुग्णालय- २ कर्मचारी यांचे ही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. तसेच काही मृतांच्या आकडेवारीत ही तफावत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्ध न केल्याने शंका आहे.)

(दिनांक ४ जुलै रोजीचा प्रसिध्द अहवाल)

(दिनांक ५ जुलै रोजीचा प्रसिध्द अहवाल)

[ वाचकांनी कृपया मुरबाडच्या आरोग्य विभागाबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)








1 Comments

  1. सर्व जाऊद्या रोज चे विलगिकर्णाचे आकडे पेंडिंग रिपोर्ट प्राप्त आकडे चा आकडा बघा.. नक्की कसली आकडेवारी चालू आहे तेच कळत नाहीये.. गेल्या 3-4 दिवसापासून 88च रिपोर्ट येणे बाकी आहेत ते काही येत नाहीयेत परंतु रोज नवीन रुग्ण मात्र येत आहेत😂

    ReplyDelete