शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी शिवेसनेचे (UBT) भजन-कीर्तन आंदोलन दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांकडून कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीची तहसील कार्यालयापर्यंत उचलबांगडी -Kishor K. Gaikwad

 

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी शिवेसनेचे भजन-कीर्तन आंदोलन  

दखल न घेतल्याने संतप्त आंदोलकांकडून कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीची तहसील कार्यालयापर्यंत उचलबांगडी

Kishor K. Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि. ८) : (किशोर गायकवाड) ऐन शेतकी हंगामात मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांचा योग्य पुरवठा होत नसल्याच्या निषेर्धात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शेतकऱ्यांं समवेत मुरबाड कृषी कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले.

 दरवर्षी मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लागवडी नंतर लागणाऱ्या खतांची अपुरी उपलब्धता लक्षात घेऊन मुरबाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने (दि. ३० रोजी) याबाबत लेखी मागणी करण्यात आली होती. यावेळी, सेना पदाधिकारी यांनी उपलब्ध कृषी विभागाचे मंडळ अधिकारी यांचेशी रीतसर चर्चा करून लवकरात लवकर मुरबाडच्या शेतकरी बांधवांना आवश्यकते नुसार मुबलक खत पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. 

 मात्र, कृषी विभागाने याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत पक्षाच्या वतीने या निषेधार्थ आज मुरबाड तालुका कृषी कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, सहसंपर्क प्रमुख नरेश देसले, विधानसभा क्षेत्र संघटक भरत गायकर, तालुका समन्वयक विनायक ढमणे, शहर प्रमुख संदीप बहाडकर, तालुका सचिव नरेंद्र (भाऊ) यशवंतराव, युवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश चौधरी, युवासेना सचिव मिलिंद घरत सह अनेक प्रमुख पदाधिकारी, कायकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी होते. 

 सकाळी अकरा वाजेपासून सुरू करण्यात आलेल्या या भजन आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी कृषी अधिकारी यांची खुर्ची ताब्यात घेऊन पायी घोषणाबाजी करीत थेट मुरबाड तहसील कार्यालय गाठले. याठिकाणी उपस्थित कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी मध्यस्थी करून आंदोलन कर्त्यांचे समाधान केले. मुरबाड तालुक्यातील शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खत पुरवठा समस्ये समवेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची देखील जलादरीत्या दखल घेतली जाईल, अशा आश्वासन प्राप्तीनंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.


(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-Kishor K Gaikwad

वाचा...






















Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments