#जय शिवराय : मुरबाड | शिवमय वातावरणात शिवजन्मोत्सव साजरा..!
KISHOR GAIKWAD | SHABD MASHALमुरबाड (दि. १९) : बहुजनांच्या सुख, संरक्षण आणि समृद्धीसाठी स्वराज्य स्थापन करणारे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा ३९२ व्या शतकोत्तर जयंतीमहोत्सव आज संपूर्ण देशभरात साजरा होत असून मुरबाड तालुक्यात कोरोनाची खबरदारी बाळगून ठिक-ठिकाणी, चौकात, गावोगावी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन, अभिवादन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शिवजयंती दिनी शहतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाला पताका, हारफुलें, पणत्या, प्रकाशदिवे, रोषणाई आदींनी सजावट करून शिवदर्शनासाठी खुला करण्यात आला. रात्रभरापासून येथे शिव अनुयायांचा दर्शनासाठी राबता असतो. शिवजयंती उत्सव समिती, मुरबाड यांचे मार्फत दरवर्षी मुरबाड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनाला आमंत्रण टाळण्यासाठी मुरबाड शहरात (Murbad City) दरवर्षी होणारी भव्य मिरवणूक यंदाही रद्द करून स्मारका जवळ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दीपमहोत्सव. महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना, फटाक्यांची आतिषबाजी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पोलीस बांधवांच्या हस्ते शिवदुग्धाभिषेक!
शिवजयंती महोत्सव समिती, ठाणे जिल्हा तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही तालुक्यातील म्हसा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आले. समितीचे जिल्हाध्यक्ष इंजि. चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा केला जात असून मागील वर्षी या दुग्धाभिषेकाचा मान पत्रकारांना देण्यात आला होता. त्याआधी सन २०२० मध्ये आजीबाई शाळेतील विद्यार्थिंनींकडून तर सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला होता. तर यंदा मुरबाड पोलीस या दुग्धाभिषेक सोहळ्याचे मानकरी ठरले. मुरबाड तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे व उपनिरीक्षक तोडकरी, निंबाळकर तसेच हवालदार निचिते, मोरे,भोसले उपस्थित होते.
म्हसा महाविद्यालयात शिवजयंती साजरी..!
तालुक्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,म्हसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचेचे पूजन करून शिक्षकांनी शिवजयंती महोत्सव साजरा केला. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रमणी मोहिते यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी आर्या शिंदे, प्रिया ढमके, साक्षी गायकर यांनी गाणे सादर केले. तर प्रतिक पवार, रूपेश वारघडे यांनी भाषणे दिली. तसेच प्रियंका बांगर आणि ग्रुपने पोवाडा सादर करून महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून दिले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. लोहार सर यांनी केले. तर महेंद्र पष्टे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक यशवंतराव सर, भालेराव सर, गोडांबे मॅडम, चौधरी मॅडम, प्रा. निपुरते मॅडम, कराले मॅडम, संजीवनी ढमके, सुनिल रेंघे सर, प्रा. जगन्नाथ कथोरे, भानुदास घागस, मल्हारी घरत, रमाबाई व विद्यार्थी-विद्यार्थिनी आदि उपस्थित होते. कुटुंबा समवेत जयंती साजरी..!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिव अनुयायांनी कुटुंबा समवेत घरात देखील साजरी केली. घरगुती शिवजयंती उत्सवाचा यंदाचा पाचवा वर्ष असल्याचा तालुक्यातील साजई गावचे रहिवासी, शिक्षक एकनाथ देसले यांनी शब्द मशालशी बोलतांना सांगितले. यादिवशी अनेक आप्तेष्ट, गावकरी, मित्रमंडळी त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. सोबतच महिलांच्या हस्ते शिवरायांचे औक्षण तसेच स्मरण व लहानमोठ्यांना मिष्टान्न, गोडगोड खाऊचे वाटप अशा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
तसेच तालुक्यातील गावागावात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. वाहनांना महाराजांच्या प्रतिमेचे झेंडे, नाक्यांवर बॅनर, स्पीकरवर पोवाडे लावून जयंती साजरी करण्यात आली. खेडोपाड्यातील लहानमुलांचा जल्लोष यावेळी पाहण्यासारखा होता.

शहरातील मातानगर येथे उत्साहात शिवजयंती साजरी करतांना ग्रामस्थ
#जय शिवराय : मुरबाड | शिवमय वातावरणात शिवजन्मोत्सव साजरा..!
KISHOR GAIKWAD | SHABD MASHAL
मुरबाड (दि. १९) : बहुजनांच्या सुख, संरक्षण आणि समृद्धीसाठी स्वराज्य स्थापन करणारे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा ३९२ व्या शतकोत्तर जयंतीमहोत्सव आज संपूर्ण देशभरात साजरा होत असून मुरबाड तालुक्यात कोरोनाची खबरदारी बाळगून ठिक-ठिकाणी, चौकात, गावोगावी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन, अभिवादन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शिवजयंती दिनी शहतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाला पताका, हारफुलें, पणत्या, प्रकाशदिवे, रोषणाई आदींनी सजावट करून शिवदर्शनासाठी खुला करण्यात आला. रात्रभरापासून येथे शिव अनुयायांचा दर्शनासाठी राबता असतो. शिवजयंती उत्सव समिती, मुरबाड यांचे मार्फत दरवर्षी मुरबाड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनाला आमंत्रण टाळण्यासाठी मुरबाड शहरात (Murbad City) दरवर्षी होणारी भव्य मिरवणूक यंदाही रद्द करून स्मारका जवळ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दीपमहोत्सव. महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना, फटाक्यांची आतिषबाजी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पोलीस बांधवांच्या हस्ते शिवदुग्धाभिषेक!
शिवजयंती महोत्सव समिती, ठाणे जिल्हा तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही तालुक्यातील म्हसा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आले. समितीचे जिल्हाध्यक्ष इंजि. चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा केला जात असून मागील वर्षी या दुग्धाभिषेकाचा मान पत्रकारांना देण्यात आला होता. त्याआधी सन २०२० मध्ये आजीबाई शाळेतील विद्यार्थिंनींकडून तर सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला होता. तर यंदा मुरबाड पोलीस या दुग्धाभिषेक सोहळ्याचे मानकरी ठरले. मुरबाड तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे व उपनिरीक्षक तोडकरी, निंबाळकर तसेच हवालदार निचिते, मोरे,भोसले उपस्थित होते.
म्हसा महाविद्यालयात शिवजयंती साजरी..!
तालुक्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,म्हसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचेचे पूजन करून शिक्षकांनी शिवजयंती महोत्सव साजरा केला.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रमणी मोहिते यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी आर्या शिंदे, प्रिया ढमके, साक्षी गायकर यांनी गाणे सादर केले. तर प्रतिक पवार, रूपेश वारघडे यांनी भाषणे दिली. तसेच प्रियंका बांगर आणि ग्रुपने पोवाडा सादर करून महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून दिले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. लोहार सर यांनी केले. तर महेंद्र पष्टे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक यशवंतराव सर, भालेराव सर, गोडांबे मॅडम, चौधरी मॅडम, प्रा. निपुरते मॅडम, कराले मॅडम, संजीवनी ढमके, सुनिल रेंघे सर, प्रा. जगन्नाथ कथोरे, भानुदास घागस, मल्हारी घरत, रमाबाई व विद्यार्थी-विद्यार्थिनी आदि उपस्थित होते.
कुटुंबा समवेत जयंती साजरी..!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिव अनुयायांनी कुटुंबा समवेत घरात देखील साजरी केली. घरगुती शिवजयंती उत्सवाचा यंदाचा पाचवा वर्ष असल्याचा तालुक्यातील साजई गावचे रहिवासी, शिक्षक एकनाथ देसले यांनी शब्द मशालशी बोलतांना सांगितले. यादिवशी अनेक आप्तेष्ट, गावकरी, मित्रमंडळी त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. सोबतच महिलांच्या हस्ते शिवरायांचे औक्षण तसेच स्मरण व लहानमोठ्यांना मिष्टान्न, गोडगोड खाऊचे वाटप अशा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
तसेच तालुक्यातील गावागावात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. वाहनांना महाराजांच्या प्रतिमेचे झेंडे, नाक्यांवर बॅनर, स्पीकरवर पोवाडे लावून जयंती साजरी करण्यात आली. खेडोपाड्यातील लहानमुलांचा जल्लोष यावेळी पाहण्यासारखा होता.
| शहरातील मातानगर येथे उत्साहात शिवजयंती साजरी करतांना ग्रामस्थ |
_________________________________________________
[ #जय शिवराय : विविध उपक्रमांनी मुरबाडमध्ये शिवजन्मोत्सव साजरा..! ]
[#RECRUITMENT : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विविध बँकेंमध्ये ९५० जागांसाठी भरती..!]
[#IMPACT : रिपाइंच्या आंदोलना आधीच बीडीओचं पत्र..!]
[#मुरबाड माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..!]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

0 Comments