पहा व्हिडिओ : अन् नागोबाने अडवला रस्ता..!
प्रसंग कॅमेऱ्यात कैद...
[Shabd Mashal | Kishor Gaikwad ]
मुरबाड (किशोर गायकवाड): (दि. २५) उन्हाळा सुरू झाला की वन्य पशु-पक्षी-प्राणी हे भक्ष्य, पाणी आणि गारव्याच्या शोधार्थ भटकंती करीत असतात. याच दरम्यान त्यांचा अनेकदा मानवी जनजीवनाशी सामना होत असल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक प्रौढ सर्प रानातून बाहेर पडून थेट रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसल्याचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
नागा सारखा अत्यंत विषारी सर्प सर्वज्ञात आहे. रानात मुक्त संचार करणारे हे वन्य जीव अनेकदा मानवी वस्तीमध्ये आढळून येतात. मात्र या नागोबाने थेट रहदारीच्या रस्त्यावरच आपला कब्जा केला होता. वृत्तसंकलनासाठी निघालेले दै. नवाकाळचे पत्रकार जयदीप अढाईगे व त्यांचे सहकारी पत्रकार किशोर गायकवाड यांना हा सर्प नजरेस पडताच सर्वप्रथम त्यांनी दुतर्फा येणारी वाहतूक थांबून प्रवाश्यांना सावध केले. मुरबाडमधील देवगाव-माळीपाडा रस्त्यावरील भर दुपारची ही घटना आहे.
या नागोबाच्या रस्त्यावरील मालकीहक्कामुळे अनेक वाहनचालकांना आपली वाहने थांबवून प्रतीक्षा करावी लागली. मात्र बराच वेळ होऊन नागोबा जात नसल्याचे पाहून गायकवाड यांनी रुमलाच्या साहाय्याने त्याला वन्य परिसराकडे पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे १० ते १५ मिनिटांच्या कसरतीनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अखेर तो नागोबा आपल्या घराकडे रवाना झाला. या दरम्यान त्याच्या रुबाबदार शैलीचे, उग्र स्वरूपाचे व जंगलात रवाना होतांना शरीराने घेतलेली डौलदार वळणे यांचे चित्रीकरण पत्रकार अढाईगे यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले आहेत.
सदर रस्ता हा लोकवस्ती कडे जाणारा असल्याने यामार्गे शालेय विध्यार्थी, लहान मुले, वृद्ध व अन्य ग्रामस्थ यांची रहदारी असते. प्राणी, सर्प यांच्या अशा वावराने एखादी अनपेक्षित हानी घडण्याची दाट संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबींना गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.
मात्र हे सर्प रानातून वारंवार रस्त्याकडे येत असतील तर याबाबत वन विभागाने लक्ष घातले पाहिजे. मुळात सर्प व अन्य वन्य प्राणी जंगलातून लोकवस्तीकडे अथवा रस्त्याकडे येत असतील तर त्यांच्या अधिवासात पाणी, अन्न अथवा त्यांच्या सुरक्षिततेचा यांचा प्रश्न निर्माण झालाय का? याबाबत संबंधित वन विभागाने संशोधन करणे अनिवार्य आहे.
_______________________________________________
[ #जय शिवराय : विविध उपक्रमांनी मुरबाडमध्ये शिवजन्मोत्सव साजरा..! ]
[#मुरबाड माळशेज अपडेट्स : माळशेज मार्गे धोकादायक प्रवास कायम..!]
असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा




असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा






0 Comments