 |
| Accident prone areas in malshej ghat |
सावधान : सध्या दरडीपेक्षा ही 'हा' मोठा धोका माळशेजमध्ये घात लावून बसला आहे..!|This is the bigger threat than the Landslide in Malshej Ghat
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : पावसाळ्यात माळशेज मार्गे प्रवास म्हंटल की डोळ्यासमोर चित्तथरारक दरडींचा चित्र उभा राहतो . मात्र सध्या त्याहून अधिक मोठा धोका संपूर्ण माळशेज पट्ट्यात घात लावून बसला आहे.
 |
| Accident prone areas in malshej ghat 1 |
गेल्या काही वर्षांपासून माळशेजची प्रतिमा काहीशी धोकादायक म्हणून प्रचलित झाल्याने पर्यटक तसेच यामार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माळशेज महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचा नाव घेत नाही. शिवाय कोट्यवधी रुपये खर्चून ही हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित झाला नाही. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
 |
| Accident prone areas in malshej ghat 2 |
 |
| Accident prone areas in malshej ghat 3 |
 |
| Accident prone areas in malshej ghat 4 |
पावसाळ्यात माळशेज घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्चून लोखंडी जाळ्या लावणे, सिमेंट काँक्रीटच्या भिंती बांधणे, केमिकल जन्य पदार्थांचा वापर करून गिलावा करणे, अशा विविध उपाययोजना ही सुरू असतात. मात्र दरड कोसळण्याच्या प्रमाणावर काही नियंत्रण मिळवता आले नाही. त्यातच आता या महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांच्या मुळांखालील माती धसल्याने ही वृक्षे महामार्गावर झुकून प्रवाश्यांना धोकादायक बनली आहेत. अशातच ती केव्हाही कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली असून महामार्ग विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे.
 |
| Accident prone areas in malshej ghat 5 |
 |
| Accident prone areas in malshej ghat 6 |
देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या या माळशेज घाट मार्गे दिवसरात्र प्रवासी वाहतूक व माल वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू असते. कोणत्याही क्षणी ही धोकादायक वृक्षे उन्मळून महामार्गावर, वाहनांवर कोसळण्याची दाट संभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे असे अनपेक्षित अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने वेळेत नियोजन करणे अनिवार्य आहे. अन्यथा कोण्या निष्पाप प्रवाशाला आपल्या जीवाला मुकाव्या लागल्याच्या घटना कानावर आल्या शिवाय राहणार नाहीत.
 |
| Accident prone areas in malshej ghat 6 |
 |
| Accident prone areas in malshej ghat 7 |
(किशोर गायकवाड)
______________________________________________
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)
0 Comments