वाचा : 'या' कारणामुळे मुरबाडची वीज होते खंडीत... [ MSEB MURBAD NEWS ]


 वाचा : 'या' कारणामुळे मुरबाडची वीज होते खंडीत... [ MSEB MURBAD NEWS ]

MSEB Murbad
Murbad MSEB Feeder Panel


वीज ग्राहकाच्या माहीतीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती... 

[ KISHOR K. GAIKWAD ]


मुरबाड : (दि. ८) गेल्या काही दिवसांपासून मुरबाड शहर आणि तालुक्यातील विज पुरठवा खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

   पावसाळ्याचे आगमन आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण, हे समीकरण मुरबाड तालुक्यात नित्याचे आहे. त्यात विद्यार्थ्यांचे शिक्षण हल्ली घरातच ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वायफायचे मॉडेम अशी उपकरणे पूर्णपणे इलेक्ट्रिसीटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे विजेच्या सद्या सुरू असलेल्या लपंडावाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याच्या ही तक्रारी वाढत आहेत.

  

MSEB MURBAD OFFICE
MSEB MURBAD OFFICE

   विद्युत उपकरणे व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विद्युत वितरण कंपनीच्या सब स्टेशनवर फिडर बसवले असतात. धोका आढळून येताच अथवा एखादा इलेक्ट्रिकल अपघात झाल्यास ते ऍक्टिव्ह होऊन ट्रिप होतात व वीज पुरवठा खंडित करतात. त्यामुळे होणाऱ्या मोठ्या हानीची संभावना टळते आणि मग तिथून पुढे वीज वितरणच्या इंजिनिअरिर्स टीमचे काम सुरू होते. फौल्ट शोधून ते दुरुस्ती केले जातात व खात्री करून ट्रिप झालेले विद्युत फिडर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पूर्ववत केले जातात. या सर्व प्रक्रियेला ठराविक कालावधी लागत असल्याने नागरिकांना विजे अभावी होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

    

MSEB Murbad Transformer
MSEB Murbad Transformer

   मुरबाड टाऊन आणि सरळगाव एकच सब स्टेशनवर अवलंबून असल्याने वीज पुरवठ्या दरम्यान अनपेक्षितपणे एखादा अडथळा उद्भवल्यास दोन्ही विभागाच्या नागरिकांना खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सरळगाव विभागाचा विज पुरवठा सद्या मुरबाडच्या फिडरवर अवलंबून आहे. तसेच यांची लेंथ ही अधिक असल्याने अनेकदा वादळ, वारा, पाऊस यामुळे टेक्निकल अडथळे उद्भवतात. परिणामी धोका टाळण्यासाठी हे इलेक्ट्रीक फिडर तात्काळ विज पुरवठा बंद करतात, जेणेकरून यातून मोठा अपघात घडू नये.

  मात्र सरळगाव विभागासाठी नांदगाव फाटा येथे स्वतंत्र विज पुरवठ्या करिता सिटी स्टेशनचे काम सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. त्यामुळे सरळगाव वासीयांना वीज पुरवठ्याच्या अडचणींबाबत दिलासा मिळणार असल्याचे मुरबाड उपविभागाचे उपअभियंता सुरेश सुराडकर यांनी सांगितले.

   मुरबाड एम. एस. इ. बी. अंतर्गत सुमारे पावणे दोनशे किलोमीटरपेक्षा अधिक विद्युत पुरवठ्याचे जाळे आहे. मात्र  अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे वेळेत लोकांच्या तक्रारींना मार्गी लावणे शक्य होत नसल्याने मुरबाड एम. एस. इ. बी. कायम वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. तसेच जीर्ण विजेचे खांब व विद्युत तारा, असुरक्षित इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, अवाजवी वीजबिले अशा अनेक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. याबाबत महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून मुरबाड तालुक्यातील समस्यांची दखल घेणे गरजेचे आहे. 


(आपल्या तक्रारीसाठी विद्युत ग्राहक मुरबाड MSEB च्या 02524-222454 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.)




Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments